IND vs PAK T20 World Cup 2022 marathi actor pravin tarde appreciating team india and virat kohili for india paksitan match spg 93 | IND vs PAK T20 World Cup 2022 : भारताच्या ‘या’ अभूतपूर्व विजयावर प्रवीण तरडे म्हणाले, “दिवाळी आपल्याला … “

IND vs PAK T20 World Cup 2022 marathi actor pravin tarde appreciating team india and virat kohili for india paksitan match spg 93 | IND vs PAK T20 World Cup 2022 : भारताच्या ‘या’ अभूतपूर्व विजयावर प्रवीण तरडे म्हणाले, “दिवाळी आपल्याला … “

ज्या सामन्याकडे संपूर्ण देश टक लावून बघत होता त्या भारत पाकिस्तान सामन्यात, भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आहे. टी२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला रंगला होता. विराट कोहलीच्या तुफानी फलंदाजीने सामना खेचून आणला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८३ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सध्या सगळीकडे विराटाचे कौतूक होत आहे.

मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत विराटाचे कौतुक केले आहे. ते असं म्हणाले ‘दोस्तांनो दिवाळी आपल्याला आजच साजरी करायची आहे. जय हिंद भारत माता कि जय ये हैं मेरा इंडिया, विराट कोहली लव्ह यू, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.’

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत पाक सामन्यातला शाहरुख खानचा जुना व्हिडीओ झाला व्हायरल

भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले.

पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. विराट कोहली हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

Aniket Ghate