Hrithik Roshan is going to live with girlfriend Saba Azad in Mannat has spent 100 crores

Hrithik Roshan is going to live with girlfriend Saba Azad in Mannat has spent 100 crores

मुंबई : सबा सिंग ग्रेवाल हिला बॉलिवूडमध्ये सबा आझाद या नावाने ओळखले जाते. ती एक भारतीय अभिनेत्री, थिएटर दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. ते मुंबईस्थित इलेक्ट्रो फंक जोडी मॅडबॉय/मिंकचा भाग आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये काही वर्षापूर्वी पदार्पण केले.

सध्या अभिनेत्री सबा आझाद अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या अफेअरमुळे खूपच चर्चेत आहे. हृतिक हा कायमच त्याची स्टाईल, त्याचे आगामी चित्रपट, काहीच नाही तर त्याची Ex Wife सुझैन खानमुळे चर्चेत असतो. मात्र आता हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि यामगचं कारम म्हणजे हे दोघं एकत्र राहणार असल्याचं बोललं जात आहे.

 हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद यांनी आता एकत्र राहून त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघंही लवकरच एका आलिशान फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहेत. साबा आणि हृतिक रोशन अनेकदा एकत्र दिसले. बहुतेक कार्यक्रमांमध्ये दोघंही एकत्र दिसतात.  हृतिक रोशन आणि सबा आझाद मुंबईतील मन्नत नावाच्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

एका रिपोर्टनुसार, एका नवीन फ्लॅटमध्ये काम सुरू आहे, जे पूर्ण झाल्यानंतर दोघंही एकत्र राहतील. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं जात आहे की, हृतिक रोशनने या इमारतीत दोन अपार्टमेंट घेतले आहेत ज्यासाठी त्याने सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. रिपोर्टनुसार, हृतिक रोशनने जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ असलेल्या मन्नतमध्ये 97.50 कोटींना दोन अपार्टमेंट खरेदी केलं आहे. साबा आणि हृतिकचं नवीन घर सीन चेहऱ्यावर आहे, जे खूप प्रेक्षणीय दृश्य देतं.

बातम्यांनुसार, स्टार कपलचं हे घर 38,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. 15व्या आणि 16व्या मजल्यावर असलेला हा डुप्लेक्स फ्लॅट असल्याचं अहवालात म्हटलं आहे. यामध्ये पहिल्या फ्लॅटसाठी 67.50 कोटी, तर दुसऱ्या फ्लॅटसाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, हृतिक आणि सबा काही काळ एकत्र राहण्याचा विचार करत आहेत आणि लवकरच हे पाऊल उचलणार आहेत. हृतिक आणि सबा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

Aniket Ghate