त्यांनी केला होता रतन टाटांचा अपमान.. टाटांनी 9 वर्षांनी 9300 कोटी रुपये मोजून घेतला होता अपमानाचा बदला

सृष्टीवरच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीनाकधी वाईट वेळ ही येतच असते त्यावेळेत तो स्वतःला हरलेला समजत असतो. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जो वेळ आपल्याला खाली पाडण्यास प्रवृत्त करतो तो आपल्याला नंतर आपल्या वर घेऊन जाण्यात देखील मदत करत असतो. प्रत्येकाचीच परिस्थिती ही चांगली आणि वाईट असते ज्यामध्ये त्याला संयम ठेवून काम करायला पाहिजे आणि पुढे जायला हवे.
काही वर्षांपूर्वी भारतातील प्रसिद्ध बिझनेसमॅन रतन टाटा यांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. जेव्हा परिस्थितीने त्याला इतरांसमोर झुकण्यास भाग पाडले होते आणि त्याचाच गैरफायदा घेत पुढच्या माणसाने त्यांना अपमानकारक वागणूक दिली होती. फोर्ड कंपनीकडून त्यांना अपमानास्पद वागणूक ही मिळाली होती. याच्यानंतर रतन टाटा यांनी याचा बदला आपल्या मेहनत आणि एकाग्रतेने घेतला जो फोर्डच्या मालकाला आजही लक्षात असेल.
28 डिसेंबर 1937 रोजी गुजरातमधल्या सुरत या शहरात जन्मलेले रतन टाटा यांचे पूर्ण नाव ‘रतन नवल टाटा’ असे आहे. स्वभावाने एकदम लाजाळू आणि पुस्तकांशी मैत्री असणारे असे आपले टाटा हे मुंबईतील एका फ्लॅटमध्ये एकटेच राहत असे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठी वाईट भूतकाळ असतो. आणि अगदी तसेच टाटांच्या बाबतीत सुद्धा एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी आपली टाटा मोटर्स कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता.
ही गोष्ट आहे 1998 ची, जेव्हा रतन टाटा यांची कंपनी टाटा मोटर्सने ‘टाटा इंडिका’ ही कार लाँच केली होती आणि या प्रकल्पातून टाटा मोटर्सच्या खूप अपेक्षा होत्या परंतु त्यांना या प्रकल्पातुन खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. जेव्हा परिस्थिती वाईट होऊ लागली, तेव्हा कंपनीच्या भागधारकांनी व अधिकाऱ्यांनी टाटा यांना ही कंपनी वेळेत विकण्याच्या सल्ला दिला. यास सहमती दर्शविल्यानंतर टाटा हे स्वत: आपल्या अधिकाऱ्यांसोबत फोर्ड कंपनीशी करार करण्यासाठी अमेरिकेत पोहोचले.
तिथल्या त्या तीन तासांच्या बैठकीत फोर्ड कंपनीचे चेअरमन यांनी टाटा यांना अतिशय वाईट वागणूक दिली आणि म्हणाले जेव्हा तुम्हाला या व्यवसाया बद्दल काही ज्ञान नव्हतेच तर या गाडीमध्ये एवढे पैसे का गुंतवले. आता आम्ही ही कंपनी खरेदी करून आपल्यावर खूप उपकार करत आहोत. अगोदरच टाटा हे कंपनीत झालेल्या लॉसमुळे खूप नाराज होते आणि आता फोर्ड कंपनीचे चेअरमनचे असे हे शब्द ऐकून त्यांना मोठा धक्काच बसला होता.
रतन टाटा यांनी ही डिल रद्द करत भारतात परत आले आणि त्या प्रकल्पात पुन्हा काम करायला सुरुवात केली. आणि रात्रंदिवस या प्रोजेक्टवर काम केले 2008 पर्यंत कंपनीला त्यांनी या प्रोजेक्टशी लायक बनवून दाखवले. ते म्हणतात ना, संकटात व्यक्तीने संयमाने काम करायला हवे कारण वेळ ही प्रत्येकाची बदलतेच आणि परिस्थिती देखील कधीनाकधी सुधारते.
एक काळ असा होता की जेव्हा रतन टाटा खूप निराश झाले होते परंतु त्यांनी संयम राखून काम केले आणि कंपनीत कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली. मेहनतीचे फळ बघा 2008 मध्ये कंपनी नफ्यात होती तर दुसरीकडे फोर्ड कंपनी ही दिवाळखोरीत निघाली होती. आणि आता वेळ टाटांची होती, ज्या प्रोजेक्ट मुळे फोर्डला तोटा झाला होता. तो प्रोजेक्ट आम्ही विकत घेऊ असा प्रस्ताव टाटांनी फोर्ड समोर ठेवला. रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी चक्क जग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) कंपनीच खरेदी केली होती. टाटा यांनी जग्वार कंपनीसाठी सुमारे 9300 कोटी रुपये मोजले होते.
रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने जग्वार कंपनी खरेदी केल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय प्रवीण काडले यांनी सांगितली. फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांना म्हटले, ‘जेएलआर खरेदी करून तुम्ही आमच्यावर मोठे उपकार केले आहेत.’ आणि हाच रतन टाटांचा विजय होता. दरम्यान, त्याकाळात जेएलआर तोटात होती. मात्र, काही वर्षातच टाटा जेएलआरने तोटा भरुन काढला होता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.