चुकुनही ही झाडं घरात लावू नका, नाहीतर लक्ष्मी देवी होईल नाराज, आणि तुमच्या पैशाला लागेल गळती

चुकुनही ही झाडं घरात लावू नका, नाहीतर लक्ष्मी देवी होईल नाराज, आणि तुमच्या पैशाला लागेल गळती

आपण बऱ्याचदा सजावटीसाठी घरात झाडे लावतो. परंतु आपणास माहित आहे की अशी काही झाडे आहेत जी चुकूनही घरात लावू नये. वास्तुनुसार काही वनस्पतींमध्ये वास्तू दोष हा असतो. ही झाडे लावल्याने घरातली सुखसमृद्धी बाहेर निघून जाते. असे म्हणतात की ही झाडे दिसताच त्वरित घराबाहेर काढून टाकले पाहिजेत.

1) खजुराचे झाड – वास्तुशास्त्रानुसार घरी कधीही खजुराचे झाड लावू नये. ज्या घरात खजुराचे झाड असेल तर त्या घरात दारिद्र्य येईल. आर्थिक त्रास सुरू होईल. याचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो.

2) कॅक्टस वनस्पती – कॅक्टस वनस्पती घरी लावू नये. घरी कॅक्टस लावल्याने, घरातले सर्व पैसे व्यर्थ खर्चात जातात. ज्यांच्या घरात कॅक्टस वनस्पती आहे अशा लोकांच्या घरात पैशाचा योग्य वापर केला जात नाही.

3) बांबूचे झाड – बांबूचे झाड खूप उपयुक्त आहे. परंतु वास्तु विज्ञानानुसार बांबूचे झाड घरी कधीही लावू नये. घरी हे झाड लावून समस्याना बोलावणं दिले जात. हिंदू धर्मात बांबूच्या झाडाचा मृ-त्यूच्या वेळी केला जातो जेकी अशुभ चिन्ह आहे.

4) बोराचे झाड – वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे की हे झाड घरात लावू नये. ज्या लोकांच्या घरात बोराचे झाड आहे त्यांच्या घरातील पैसे गायब व्हायला लागतात. असे मानले जाते की बोराच्या झाडाची लागवड केल्यास घराची सर्व संपत्ती नष्ट होते.

5) चिंचेचे झाड – जशी चिंचेची चव आंबट असते. तशाच प्रकारे या झाडाची घरात लागवड केली तर घरातला आनंदात आंबटपणा येतो. वास्तु शास्त्रानुसार घरात लावलेली चिंचेचे झाड घराची प्रगती रोखते. याचा कौटुंबिक आरोग्यावरही परिणाम होतो.

6) पिंपळाचे झाड – वास्तुशास्त्र सांगते की घरात कधीही पिंपळाचे झाड लावू नये. जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड असेल तर ते एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन लावा किंवा मंदिरात ठेवा. असे म्हटले जाते की यामुळे आपले पैसे नष्ट होऊ शकतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate