हातात ‘असा’ बांधा लाल दोरा : कोणतेही संकट स्पर्श सुद्धा करू शकणार नाही !

हातात ‘असा’ बांधा लाल दोरा : कोणतेही संकट स्पर्श सुद्धा करू शकणार नाही !

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण आपल्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधतात. कोण फॅशन म्हणून बांधते. तर कोण पूजा विधि केल्यानंतर असे दोरे बांधतात. बहुतेक बऱ्याच जणांच्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा हा असतोच तुमच्या देखील हातामध्ये लाल रंगाचा दोरा असेलच. शक्यतो बऱ्याचश्या पूजा विधी केल्यानंतर ब्राह्मण आपल्याला आपल्या हातामध्ये असे दोरे बांधत असतात.

शक्यतो सत्यनारायणाची पूजा वगैरे केल्यानंतर हा दोरा ब्राह्मण आपल्या हातामध्ये बांधत असतात. जर आपण लाल दोरा किंवा वेगवेगळ्या रंगाने तयार झालेला दोरा जर आपण या पद्धतीने बांधला तर आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. किंवा कोणतीही वाईट शक्ती आपल्याला स्पर्श देखील करू शकणार नाही. आपले या दोऱ्यामुळे रक्षण होईल. यासाठी आपल्याला लाल रंगाचा दोरा लागणार आहे.

लाल रंगाचा दोरा म्हटल्यानंतर आपण कोणताही दोरा आणाल मात्र पूजा करतेवेळी किंवा पूजेसाठी जो दोरा वापरला जातो. तोच दोरा आपल्याला लागणार आहे. पूजेसाठी वापरला जाणारा रंगबिरंगी दोरा आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये सहज मिळतो. किंवा आपल्या घरामध्ये जर शिल्लक असेल तर हा उपाय करण्यासाठी आपण हा दोरा वापरू शकता.

दोऱ्याचा हा उपाय आपण कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकतो. मात्र हा उपाय करण्याआधी त्यातील थोडासा जोरात तोडून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. जेवढा दोरा आपण आपल्या हातामध्ये बांधणार आहोत. तेवढाच दोरा आपल्याला तोडून देवघरामध्ये ठेवायचा आहे. तो दोरा देव घरामध्ये त्याची पूजा करायची आहे.

त्या दोऱ्याची विधीपूर्वक म्हणजेच हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर अगरबत्ती लावून जीवा लावायचा आहे. अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तो दोरा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र असा आहे. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे.

हा मंत्र अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर तो दोरा आपल्याला पुन्हा देवघरामध्ये ज्या ठिकाणी ठेवला होता त्या ठिकाणीच ठेवायचा आहे. आणि ज्या दिवशी आपण त्या दोऱ्याची पूजा करणार आहोत. तो दिवस आणि ती रात्र पूर्णपणे तो दोरा देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आंघोळ पण झाल्यानंतर पुन्हा आपण आपली नेहमीची देवपूजा करायची आहे.

त्यानंतर त्या दोऱ्याची देखील हळदीकुंकू अक्षत वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर तो दोरा आपल्या हातात बांधण्यासाठी घ्यायचा आहे. जर हा दोरा महिला बांधणारा असेल तर त्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये बांधून घ्यायचा आहे. आणि पुरुषांनी हा दोरा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. आपण हा दोरा दुसऱ्याकडून कोणाकडूनही बांधून घेऊ शकतो.

आणि अशा पद्धतीने जर आपल्या घरातील सर्वच सदस्यांना हा दोरा बांधायचा असेल तर त्या पद्धतीने दोरा कट करून त्याची वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे पूजा करून सर्वांच्या हातामध्ये बांधायचा आहे. मित्रांनो हा उपाय करा याने आपले रक्षण सदैव होईल. आपल्यावर व आपल्या घरावर कसल्याही प्रकारचे संकट किंवा वाईट बाधा आपल्याला स्पर्श देखील करणार नाही. आपले रक्षण होईल.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Monish Udbatte