har har mahadev actor subodh bhave wishesh godvari and said that watched film in theatre spg 93 | ‘गोदावरी’ला सुबोध भावेने दिल्या शुभेच्छा; म्हणाला “आवर्जून चित्रपटगृहात…”

har har mahadev actor subodh bhave wishesh godvari and said that watched film in theatre spg 93 | ‘गोदावरी’ला सुबोध भावेने दिल्या शुभेच्छा; म्हणाला “आवर्जून चित्रपटगृहात…”

हिंदीप्रमाणेच मराठीतदेखील वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. या प्रीमियरला अनेक मराठीतले कलाकार उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसाद ओक, नागराज मंजुळे यांच्यानंतर अभिनेता सुबोध भावेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोधने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतूक केले आहे. तो असं म्हणाला ‘आजपासून गोदावरी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोसवत या चित्रपटाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. गोदावरी चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ‘अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘गोदावरी’ चित्रपट पाहून प्रसाद ओक भारावला; म्हणाला, “मी स्वतःला…”

Movie Review : नदी आणि मानवी नातेसंबंध यांची उत्तम गुंफण बांधणारा ‘गोदावरी’

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या सुबोध भावे त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकताच सुबोध भावेचा वाढदिवस पार पडला.

हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या चित्रपटातून इतिहासाची तोडमोड करुन दाखवण्यात आल्याचे बोललं जात आहे. झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला होता.

Aniket Ghate