भगवान हनुमानजींची कृपा हवी असेल तर हे ‘5’ उपाय करा, आर्थिक तंगी जाईल कायमची निघून

भगवान हनुमानजींची कृपा हवी असेल तर हे ‘5’ उपाय करा, आर्थिक तंगी जाईल कायमची निघून

बजरंगबलीला संकट मोचक म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान हनुमानाने आयुष्यातील प्रत्येक समस्येवर तोडगा काढलेला आहे. असे म्हणतात की हनुमानजी पृथ्वीवरील कोणत्याही त्रासाला संपवू शकतात. हिंदू धर्मात मंगळवार हा भगवान हनुमानाच्या पूजेचा दिवस, तसेच शुभ आणि मंगलकारी म्हणूनही मंगळवार हा मानला जातो. त्यादिवशी हनुमान जी आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.

मंगळवारी भाविक भगवान हनुमानजींची पूजा करतात. परंतु त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी काही खास उपाय केले पाहिजेत. या उपायांमुळे जीवनात आनंद येतो आणि वाईटाचा जीवनातुन अंत होतो. चला तर मंग या उपायांबद्दल जाणून घेऊया.

भगवान हनुमानाजींची कृपा मिळण्याचे हे 5 मार्ग

1) भगवान हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, मंगळवारी स्नान करून, स्वच्छ वस्त्र घालून, कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर 11 वेळा पूर्वेकडील दिशेने तोंड करून तुळशीच्या जपमाळासह श्रीराम प्रभूंच्या नावाचा जप करावा.

2) कोणत्याही हनुमानजी समोर प्रभू रामचंद्र यांच्या नावाचा जप करावा. असे केल्याने आयुष्यात शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येते.

3) त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी हनुमानजींच्या मंदिरास भेट द्यावी. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचे पठण करावे.

4) मंगळवारी भगवान हनुमान यंत्र बसवणे शुभ मानले जाते. हनुमान यंत्र स्थापित करून समस्या दूर होतात. तसेच रोज त्याची पूजा करावी.

5) मंगळवारी सकाळी आंघोळ केल्यावर वडाच्या झाडाचे पाने तोडा. मग ती पान पाण्याने धुवा आणि हनुमानजीसमोर ठेवा आणि त्यावर श्रीराम केसरने लिहा. या पूजेनंतर हे पान तुमच्या पर्समध्ये ठेवा, असे केल्याने जीवनात पैशांची कमतरता दूर होते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate