मंगळवारी करा हे काम, हनुमानजी ची तुमच्या घरात करतील भरभराट

मंगळवारी करा हे काम, हनुमानजी ची तुमच्या घरात करतील भरभराट

मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो. असे म्हणतात की मंगळवारी हनुमान जीची पूजा केल्यास संकटाचा अंत होतो. कारण हनुमान जी यांना संकट मोचक म्हटले गेले आहे. संध्याकाळी उपासना केल्यास त्याचा विशेष फायदा होतो.

रामभक्त हनुमान एक अतुलनीय बल धामा आहे आणि माता अंजनीचे पुत्र आहेत. हनुमानजी आपल्या भक्तांवर नेहमी दया दाखवत असतात. जो मनापासून आणि पूर्ण भक्तीने हनुमानजीची उपासना करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. हनुमान जीची उपासना केल्याने सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि चांगले आरोग्य प्राप्त होते. मंगळवार हा भगवान हनुमानास समर्पित आहे. संध्याकाळी हनुमान जीची पूजा केल्यास विशेष फळ मिळते.

अश्याप्रकारे करा पूजा –

हनुमान जीची पूजा खूप क्लिष्ट नसून अतिशय प्रभावी मानली जाते. हनुमानजीच्या भक्तांना या पूजेचे महात्म माहित आहे. हनुमानजीच्या भक्तांना कशाची भीती वाटत नाही. नेहमी आत्मविश्वासाने ते भरलेले आणि कोणतीही कार्य करण्यास सदैव तयार असतात.

संध्याकाळच्या पूजेआधी स्नान करा, पूजा घर स्वच्छ करा आणि फुले व मिठाई अर्पण करा. धूप जाळून हनुमान चालीसाचे पठण करावे. मन एकाग्र करून भगवान हनुमानाचे ध्यान करा. असे केल्याने आपण मानसिक तणावातून मुक्त व्हाल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.

या पाच ओळींमागे लपलेले आहे सफलतेचे सत्य

हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे काँधे मूँज जनेऊ साजे।
शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन।
विद्यावान गुनी अति चातुर राम काज करिबे को आतुर।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मनबसिया।
सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना।

हनुमानजीना शेंदूर अर्पण केल्याने प्रसन्न होतात श्रीरामप्रभू –

हनुमानजींना शेंदूर खूप प्रिय आहे. हनुमानजीवर शेंदूर अर्पण केल्यासअनेक प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. कारण भगवान राम यांनी त्यांना सांगितले होते की भक्त हनुमानाला जो कोणी शेंदूर अर्पण करेल, त्यावर हनुमानजींचा आशीर्वाद नेहमीच राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Aniket Ghate