गुरुवारी चुकूनही ‘हे’ काम करू नये, नाहीतर सुखी जीवनात येईल वादळ

गुरुवारी चुकूनही ‘हे’ काम करू नये, नाहीतर सुखी जीवनात येईल वादळ

गुरुवार हा दिवस ज्ञान आणि संतान कारक असतो आहे. मान्यता नुसार असे म्हणतात की गुरुवारी काही खास कामे केली जाऊ नयेत. कारण हे कुंडलीतील बृहस्पति ग्रहाची स्थिती कमकुवत करते.

जन्मकुंडली मधल्या कमकुवत गुरूमुळे लोकांना मुले, ज्ञान, पैसा इत्यादी बाबतच्या समस्याचा सामना करावा लागतो. याउलट गुरुवारी असे काही काम आहेत जी केल्याने गुरु बृहस्पतीचा आशीर्वाद हा मिळतो आणि जीवनात धन, ज्ञान आणि आरोग्याशी संबंधित फायदे मिळतात. तर मग जाणून घेऊया गुरुवारी कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.

महिलांनी गुरुवारी या चुका करु नयेत

असे मानले जाते की गुरुवारी महिलांनी आपले डोके धुऊ नये. तसेच या दिवशी महिलांनी केसही कापू नयेत. जर त्यांनी तसे केले तर हे त्यांच्या कुंडलीत गुरू ग्रह कमकुवत करते, त्यांच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण करते. नवरा आणि मुलांची प्रगतीही थांबते.

गुरुवारी दाढी किंवा नखे कापू नका –

गुरुवारी, नखे कापली नाही पाहिजे, दाढी कापू नये. कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जो व्यक्ती असे करतो त्याला देवगुरु बृहस्पती अशुभ फळ प्रधान करतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुवरही याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

गुरुवारी केळीचे सेवन टाळा

गुरुवारी केळीचे फळ खाऊ नये. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. यासह गुरुवारी घरात जादा वजनवाले कपडे धुऊन, घरातील कबाड बाहेर काढणे, घर धुणे यामुळे मुले, घरातील सदस्यांचे शिक्षण, धर्म इत्यादींवर होणारे शुभ परिणाम कमी होतात.

विवाहित जीवनात येणारे त्रास दूर करण्यासाठी हे उपाय करा –

गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी द्यावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचा जप करावा. याने वैवाहिक जीवनातले अडथळे दूर होतात.

गुरुवारी या गोष्टी दान करा –

बृहस्पतिदेवसाठी पिवळा रंग खूप लोकप्रिय आहे. ते पिवळ्या रंगाचे पीतांबरा घालतात. म्हणून त्यांच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो. गुरुवारी केशर पिवळ चंदन किंवा हळदचे दान करणे अत्यंत शुभ आहे. यामुळे घरात आनंद आणि शांती मिळते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Aniket Ghate