बॉलिवूड हादरलं ! ‘गोलमाल’ चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन

बॉलिवूड हादरलं ! ‘गोलमाल’ चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन

1989 मध्ये गोलमाल हा चित्रपट आला होता. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड गाजला होता. जवळपास 41 42 वर्ष हा चित्रपट येऊन झालेले आहेत. तरी देखील हा चित्रपट आज लागला तरी देखील प्रेक्षक तेवढ्याच आवडीने तो पाहतात. अभिनेते अमोल पालेकर यांनी आपल्या अफलातून विनोदाने या चित्रपटामध्ये धमाल उडवून दिली होती.

या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडला अनेक धक्के बसले आहेत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रीय दुखवटा देखील पाळण्यात आला.

त्यानंतर बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले. आता चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे देखील निधन झाले. गोलमाल चित्रपटामध्ये उत्पल दत्त यांच्यासह इतर कलाकारांच्या भूमिका देखील होत्या. अमोल पालेकर यांनी अतिशय जबरदस्त असे काम या चित्रपटात केले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला होता आणि हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

ऋषिकेश मुखर्जी यांनी अमोल पालेकर यांच्या सोबत नंतर अनेक चित्रपटात काम केले. आता गोलमाल चित्रपटात काम करणार्‍या मंजू सिंह यांचे देखील वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. मंजू सिंह यांनी या चित्रपटात रत्ना ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. ज्येष्ठ संगीतकार गायक स्वानंद किरकीरे यांनी ट्विटरवरून फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

मंजू सिंह आता आपल्यामध्ये नाहीत. दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम घेण्यासाठी मंजू सिंह यांनी मला दिल्लीतून मुंबईत आणले होते. त्यानंतर दूरदर्शन साठी एक काहानी शो टाइम यासारखे विविध शो केले होते. ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटात त्यांनी अतिशय प्रेमळ भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका कोणीही विसरू शकत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत स्वानंद किरकिरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मंजू सिंह या भारतीय छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध निर्माते व त्यांनी स्वराज यांनी शोटाइम इत्यादी कार्यक्रमाची निर्मिती केली होती. त्यांना प्रेमाने दीदी देखील म्हणायचे. लहान मुलांच्या कार्यक्रमाचे निवेदनही त्यांनी दिले होते. 1983 मध्ये त्यांनी शोटाइम द्वारे टेलिव्हिजन निर्माता म्हणून पदार्पण केले होते. त्यांचा एक कहाणी हा कार्यक्रम जबरदस्त रित्या गाजला होता.

अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. महिलांच्या कायदेशीर हक्कावर हा कार्यक्रम आधारित होता. मंजू सिंह यांनी लहान मुलांसाठी व तरुणांसाठी आणि चित्रपट महोत्सवाचे देखील आयोजन केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या योगदानासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.

Aniket Ghate