… म्हणून तृतीयपंथीयांचा ‘शाप’ कधीच घेऊ नये, प्रभू रामचंद्राने दिले होते ‘वरदान’

… म्हणून तृतीयपंथीयांचा ‘शाप’ कधीच घेऊ नये, प्रभू रामचंद्राने दिले होते ‘वरदान’

आपण अनेकदा रस्त्याने जाताना चौकाचौकांमध्ये तृतीयपंथीयांना पाहत असतो. तर तृतीयपंथी दुचाकी व कार चालकांना थांबवून त्याच्याकडून पैसे मागत असतात. लोक देखील त्यांना नाही म्हणत नाहीत. मात्र, काही जण त्यांना पैसे देत नाहीत. काही जणांचा तृतीय पण त्यासोबत प्रचंड वा द होतो.

अशा वेळेस तृतीयपंथी त्यांना काही वेळेस बोलतात, तर काही वेळेस श्रा प देखील देतात. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार तृतीयपंथीयांचा श्रा प कधीही घेऊ नये. त्यांचा आशीर्वाद घेतला तरच आपला आयुष्यामध्ये मंगलमय प्रसंग घडतात. अनेक धार्मिक कार्यामध्ये मंगल प्रसंगी तृतीयपंथियांना बोलावण्यात येते.

एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तर तृतीयपंथी इथे आवर्जून येतात. त्याला ते कुटुंबीय देखील नाराज न करता पैसे देऊन पाठवत असतात. याच प्रमाणे कुठल्याही लग्नामध्ये देखील तृतीयपंथी हे आवर्जून येत असतात. लग्नात देखील त्यांना पैसे देण्यात येतात. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये तृतीयपंथीयांच्या धार्मिक मान्यतेविषयी माहिती देणार आहोत.

असे सांगितले जाते की तृतीयपंथीयांचा जन्म हा ब्रह्माच्या अंगठ्यापासून झालेला आहे, अशी धार्मिक मान्यता खूप वर्षापासून आहेत. याच प्रमाणे ऋषी कशप्य आणि आरिष्ठा हे देखील हवे तृतीयपंथी यांचे वंशज मानल्या जातात. खासकरून हिमालयामध्ये तृतीयपंथीयांची उत्पत्ती झाली, असे सांगण्यात येते.

भगवान महादेवाची उपासना करणारा किन्नर कैलास हा तृतीयपंथीयांचा पूर्वज असल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे हिमालयात या नावाचे एक गाव देखील आहेत. किन्नर कैलास हा भक्तिभावाने आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करत होता. त्याचप्रमाणे तो गायगाव देखील सर्व देवी-देवतांचे मनोरंजन देखील त्या काळात करायचा, असे सांगण्यात येते.

तृतीयपंथीयांना ब्रह्म देवाचा आशीर्वाद असल्याचे देखील सांगण्यात येते. त्याचप्रमाणे बुध ग्रहाची तृतीयपंथीयांना वरदान असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ज्या लोकांना बुद्ध ग्रहाची आपल्या पत्रिकेमध्ये अडचण आहे, त्यांनी तृतीयपंथीयांना पैसे द्यावे आणि त्यानंतर आपली बुध ग्रहाची दशा ही कमी होऊ शकते.

त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती गरीब असेल तर त्याने तृतीयपंथीयांना कडून एक रुपया घ्यावा आणि तो आपल्या जवळ ठेवावा, असे केल्याने गरीबी दूर जाऊन दरिद्री माणूस देखील श्रीमंत होऊ शकतो. धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीमध्ये वीर्य अधिक असते त्याला पुत्र होतो. आणि ज्या व्यक्तीमध्ये रक्त अधिक असते त्याला मुलगी होते, असे सांगण्यात येते. ज्या व्यक्तीमध्ये वीर्य आणि रक्त हे समप्रमाणात असते त्याच्या पोटी तृतीयपंथी जन्माला येते, असे सांगण्यात येते.

धार्मिक मान्यतेनुसार प्रभू रामचंद्र हे 14 वर्ष वनवासला गेले होते. 14 वर्षे वनवासातून आल्यानंतर ते चित्रकुट येथे परतले. येथे परतल्यानंतर राजा भरत व सर्व अयोध्यावासी त्यांना आणण्यासाठी गेले. मात्र, यावेळी रामाने येण्यास नकार देऊन पुरुष आणि स्त्रियांना तिथून जाण्यास सांगितले. मात्र, यावेळी तिथे यात काही तृतीयपंथी देखील उपस्थित होते.

त्यामुळे आपल्याला भगवान रामाने येथून जाण्याचा आदेश दिला नाही, या निर्मळ भावनेने ते तेथेच राहिले. ज्यावेळेस प्रभुरामचंद्र आयोध्याकडे निघाले. त्यावेळेस रामचंद्राला रस्त्यामध्ये तृतीयपंथी भेटले त्यावेळेस रामचंद्रांनी त्यांना विचारले की, सगळेजण तर गेले आहेत. आपण येथेच का थांबला आहात. त्यावेळस त्यांनी सांगितले की, हे प्रभू राम कारण की, आपण केवळ पुरुष आणि स्त्रियांनाच जायला सांगितले होते.

त्यामुळे आम्ही येथून गेलो नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळेस भगवान रामचंद्राने तृतीयपंथीयांना आपल्या गळ्याला लावले आणि आशीर्वाद दिला की, आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवाल त्याचे मंगल होईल. ज्यांनी तुम्हाला नाराज केले त्याचे तुम्ही जर मनात आणले तर वाईट होऊ शकेल, त्या वेळेस पासूनच असे सांगण्यात येते की तृतीयपंथीयांचा श्राप हा कधीही घेऊ नाही.

Team Hou De Viral