माता लक्ष्मीला नाही आवडत या ६ गोष्टी, श्रीमंतही होतात यामुळे गरीब, जाणून घ्या त्या गोष्टींबदल

माता लक्ष्मीला नाही आवडत या ६ गोष्टी, श्रीमंतही होतात यामुळे गरीब, जाणून घ्या त्या गोष्टींबदल

माता लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाली तर ती रंकाला राजा बनवू शकते. मात्र हीच माता लक्ष्मी जर कोणावर रागावली तर मोठ्या मोठ्या श्रीमंत व्यक्तींना एका क्षणात गरीब बनवू शकते. शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लक्ष्मी मातेला आवडत नाहीत. अनेकदा आपण अजाणतेपणी अथवा आळशीपणाने अशा काही चुका करता की ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर रागावू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा ६ गोष्टी ज्या अनेकजण करतात मात्र त्यामुळे आपलेच नुकसान होऊ शकते.

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस झोपणे – आपल्या वेद तसेच पुराणांमध्ये सांगितले आहे की लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे. मात्र काही जण आळसाच्या नावाखाली सूर्योदयानंतर बराच वेळ झोपून राहतात. मात्र हे चांगले नाही. उशिरापर्यंत झोपून राहणाऱ्या लोकांवर लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नाही. काही लोक दिवसभर आराम करत नाहीत मात्र सूर्यास्त होत असताना झोपतात. ही सवयही चांगली नव्हे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस झोपणे खूप अशुभ मानले जाते

हाताने मीठ घेणे अथवा देणे – काही जणांना मीठ हातावर देण्याची सवय असते. तसेच त्यांनाही जरी मीठ हवे असल्यास ते हातानेच घेतात मात्र माता लक्ष्मीला हे आवडत नाही. जेव्हा कोणी तुमच्याकडे मीठ मागितले तर त्या व्यक्तीला भांड्यातून मीठ द्या. हाताने चुकूनही कधी मीठ देऊ नका. तसेच संध्याकाळच्या वेळेस कोणालाही मीठ देऊ नका अथवा घेऊ नका.

तोंड न धुता अभ्यास करणे – अनेक मुलांना सवय असते की जेवल्यानंतर तोंड न धुता अभ्यास करण्याची. मात्र ही सवय अजिबात चांगली नाही. ज्या घरांमध्ये अशा सवयी मुलांना असतात त्या घरातून माता लक्ष्मी दूर निघून जाते. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्यासोबत असे काही होऊ नये तर मुलांना भोजन झाल्यावर लगेचच तोंड स्वच्छ धुण्याची तसेच चूळ भरण्याची सवय लावा.

अर्ध्या जेवणावरून उठू नये – कधी अर्धवट जेवण जेवून उठून जाऊ नये. अनेकदा काही लोकांना अशी सवय असते की ते अर्धवट जेवण करून उठून जातात. मात्र ही सवय चांगली नव्हे. जेवण नेहमी पूर्ण केल्यावरच उठले पाहिजे. तरच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील. अशा लोकांच्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते. आई अन्नपूर्णेचा आशीर्वादही अशा लोकांवर नेहमी राहतो.

रात्रीच्या वेळेस केस तसेच नखे कापणे अशुभ मानले जाते. असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस अशुभ शक्ती सक्रिय होतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस केस तसेच नखे कापू नयेत. यामुळे आपल्यावर वाईट प्रभाव पडतो.

चंदन उगाळून नंतरच वापरावे- देवपुजेसाठी अनेकजण उगाळलेले चंदन वापरतात. मात्र चंदन उगाळल्यानंतर ते लगेचच वापरू नये. आधीच उगाळून एका भांड्यात ठेवाने त्यानंतर ते पुजेसाठी वापरावे. ज्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो त्या घरात नेहमी भरभराट असते. त्या घरात सुख शांती नांदत असते. त्यामुळे तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा तुमच्यावर वरदहस्त कायम राहावा तर वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate