Gangs of Wasseypur Another FIR against Zeeshan Qadri for not paying 29 lakhs to the hotel

Gangs of Wasseypur Another FIR against Zeeshan Qadri for not paying 29 lakhs to the hotel

Gangs of Wasseypur : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा (anurag kashyap) ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट चांगलाच गाजलाय. यातील अनेक पात्रे आजही लोकांच्या लक्षात आहेत. मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी, रिचा चढ्ढासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. मात्र इतर सहकलाकारांमुळेही हा चित्रपट कायमच लक्षात राहिलाय. यातील अनेक कलाकार आता वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहेत. मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या डेफिनेट (definite) अनेक दिवसांपासून वादात अडकलाय.

‘गँग्स ऑफ वासेपूर’चा अभिनेता झिशान कादरी (Zeishan Quadri) विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिशानवर एका हॉटेलचे 29 लाख रुपये न दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रांचीच्या हिंदपिरी पोलीस ठाण्यात झिशानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शालिनी चौधरी नावाच्या महिलेने झिशानवर फसवणुकीचा आरोप केला होता. रांचीमधील एका हॉटेलचे 29 लाख रुपये न भरल्याबद्दल झिशानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावर त्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापूर्वीही फसवणूकीचा आरोप

शालिनी चौधरी यांनी झिशानवर 38 लाख रुपयांची ऑडी-6 कार चोरल्याचा आणि लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. झिशान सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असेही महिलेने सांगितले होते. यावर झिशानने प्रतिक्रिया दिली होती. शालिनी आणि तिची मुले नाटकं करत माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचं झीशानने म्हटलं होतं. तसेच त्याच्यावर लावलेल्या खोट्या आरोपांबाबत आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याची विनंतीही झिशानने सरकारला केली होती. ठोस पुराव्यांशिवाय प्रसिद्धीसाठी केलेल्या या आरोपांविरोधात कठोर पावले उचलली जावीत, असे झिशानने म्हटले होते.

कोण आहे झिशान कादरी

1983 साली जन्मलेला झीशान कादरी हा झारखंडमधील धनबादचा आहे. त्याने मेरठमधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर 2008 मध्ये मुंबईत येऊन अभिनयास सुरुवात केली. झिशान हा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. गँग्स ऑफ वासेपूर या बॉलिवूड चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगमध्ये तो अनुराग कश्यपसोबत जोडला गेला होता. त्यानंतर गँग्स ऑफ वासेपूर 2 मध्ये तो स्वतः डेफिनिटच्या भूमिकेत दिसला.

‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या निर्मितीत मोठा वाटा

अनुराग कश्यपच्या सर्वात जास्त बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये झिशानने महत्त्वाची भूमिका साकारली होती. एकूण 18 कोटींमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. 2008 मध्ये झिशानने अनुराग कश्यपला वासेपूरची गोष्ट सांगितली होती. चित्रपटाची कथा ही झिशानच्या घराशेजारीच घडली असल्याचे त्यांने अनेकदा सांगितले आहे. यानंतर अनुराग कश्यपने या चित्रपटावर काम सुरु केले होते.

Aniket Ghate