कुठल्याही गणेश चतुर्थीला हे करा काम.. तुमचे कितीही अडलेले काम होईल पूर्ण.. जाणून घ्या उपाय…

कुठल्याही गणेश चतुर्थीला हे करा काम.. तुमचे कितीही अडलेले काम होईल पूर्ण.. जाणून घ्या उपाय…

जिथे विज्ञान संपते तिथे देवाचे उपाय सुरू होतात, असे म्हणतात. मात्र, सध्याच्या जगामध्ये अनेक असे लोक आहेत की, जे देवाला अजिबात मानत नाहीत. मात्र, त्यांना कुठे आघात झाल्यानंतर ते आपोआपच धार्मिक होतात, असे देखील अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. तरीदेखील आपल्या भारतामध्ये अनेक जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची गल्लत करताना दिसतात.

मात्र, श्रद्धाळू लोक हे भक्तिभावाने त्यांना जे वाटत असते ते करत असतात. आपल्या भारतामध्ये सुमारे 33 कोटी देव असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ईश्वर हा आपल्या मानण्यावर असतो. आपली जिथे श्रद्धा आहे तिथे ईश्वर हा असतो. त्यामुळे आपण कुठलेही देवाला भक्तिभावाने पूजा आपल्याला तो नक्कीच आशीर्वाद देतो.

आपण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीची पूजा करत असतो. आपण गणेश वंदन करून कुठल्याही कार्याची सुरुवात करत असतो. कुठल्याही देवाची आरती करताना सुरुवातीला ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती आपण म्हणतो. कारण की आरती गणरायाची असते. आपण अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील की, काही लोकांचे कामे हे अजिबात होताना दिसत नाहीत. त्यामुळे ते अनेक नवस बोलतात.

कोणी शिर्डीच्या साईबाबाला नवस बोलत असतात तर इतर दुसऱ्या देवाला. असा नवस बोलल्यानंतर त्यांचे काम हे पूर्ण होत असते. त्यामुळे लोकांचा देवावरील विश्वास हा वाढत असतो. गणेश देवता ही अशीच आहे. गणेशाची जो भक्ती करतो. त्याला तो नक्कीच फळ देतो, असे आजवर तरी दिसले आहे. जर आपले कुठलेही काम होत नसेल तर आपण खालील उपाय करून आपले उरलेले काम पूर्णत्वास नेऊ शकता.

असा करा उपाय..

कुठल्याही गणेश चतुर्थीला गणपतीचे उजव्या सोंडांचे चित्र घर, दुकान किंवा आपण ज्या ठिकाणी काम करत असाल अशा ठिकाणी लावावे. त्याची पूजा करावी. त्यांच्यापुढे लवंग आणि सुपारी ठेवावी. जेव्हा तुम्ही कामावर जात असाल तर या लवंग आणि सुपारीला सोबत घेऊन गेल्याने तुमचे कार्य पूर्ण होतील. रोज एक लवंग आणि सुपारी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.

कामावर जाण्याअगोदर लवंग चोखायला पाहिजे व सुपारी पुन्हा गणपतीजवळ आणून ठेवावी व निघताना ‘जय गणेश दूर कर क्लेश’ असे संबोधावे. असे केल्याने तुमचे रोखलेले काम हे अवश्य पूर्ण होते. हा उपाय आपणही करा आणि इतरांनाही सांगा. जेणेकरून इतरांची रुकलेली कामे पूर्ण होतील. असे केल्याने आपले नुकसान काही होणार नाही. मात्र, झाले तर काम तर नक्कीच होणार आहे. कोणी याला अंधश्रद्धा म्हणेल, तर कोणी श्रद्धा म्हणेल. मात्र, यातून नुकसान अजिबात होणार नाही.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate