बॉलीवूड हादरल ! ‘गल्ली बॉय’ मधील कलाकाराचे निधन

बॉलीवूड हादरल ! ‘गल्ली बॉय’ मधील कलाकाराचे निधन

बॉलीवूड मध्ये दुःखाच्या बातम्या कमी होण्याचे नाव घेत नाही. गानकोकिळा लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांच्यानंतर आता एका तरूण कलाकाराचे निधन झाले आहे. आपण जे ऐकले ते खरे आहे. गली बॉय चित्रपटातील एमसी तोडफोड अर्थात रॅपर धर्मेश प्रधानचे नुकतेच निधन झाले आहे.

केवळ वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेश हा मुंबईतील स्ट्रीट रॅपर आणि त्यातही गुजराती गीतांसाठी खूप प्रसिद्ध होता. त्याच्या अकाली निधनाने अनेकांना दु:ख झाले. मुंबईतील रॅपर टीमला वाढण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे. मुंबईमध्ये 50 जणांची एक टीम रॅफर गाण्याने तयार करते.

त्यामध्ये तो सगळ्यात आघाडीचा रॅफर होता, असे देखील सांगण्यात येत आहे. गुजराती गाणी तो अतिशय जबरदस्त रॅप पद्धतीने म्हणायचा. काही वर्षा पूर्वी गली बॉय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. 2019 साली हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटात रणवीर सिंह याची भूमिका होती, तर सिद्धांत चतुर्वेदी हा देखील या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटामध्ये धर्मेश परमार याने देखील काम केले होते. मुंबईतील स्ट्रीट रॅपर मध्ये तो खूपच प्रसिद्ध होता. त्याच्या निधनाची बातमी आल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह याने इंस्टाग्राम स्टोरी ठेवत दुःख व्यक्त केले आहे.

त्याचप्रमाणे अनेकांनी देखील सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. झोया अख्तर हिने धर्मेशचा फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट करत ‘तू लवकर गेलास’ आपण भेटल्याचे मला माझं भाग्य वाटतं’, असं म्हटले आहे. सिद्धांत चतुर्वेदी याने देखील दुःख व्यक्त केले आहे. गली बॉय या चित्रपटामध्ये अतिशय जबरदस्त अशा भूमिका रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी केल्या.

या चित्रपटात त्याने देखील काम केले होते. धर्मेश याने वयाच्या चोविसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याचे नेमक्या कुठल्या कारणाने निधन झाले, याबाबत काही माहिती कळू शकली नाही. मात्र त्याच्या मृत्यूने अनेकांना हळहळ लागली आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास तेथील सुरू केला आहे.

त्याच्या मृत्यू मागे नक्की काय कारण आहे याचाही तपास करण्यात येत आहे.

Aniket Ghate