…आणि अमेरिकेत चक्क गाईच्या पोटाला छिद्र पाडतात? गाईच्या पोटाला छिद्र पाडण्यामागचे काय कारण आहे.

…आणि अमेरिकेत चक्क गाईच्या पोटाला छिद्र पाडतात? गाईच्या पोटाला छिद्र पाडण्यामागचे काय कारण आहे.

गायीच्या पोटाला छिद्र हे वाचूनच तुम्हाला जरा विचित्र वाटलं असेलना? एवढंच काय तर हे ऐकून अंगावर काटा आला ना आणि भितीदायकही वाटतं ना. परंतु यामध्ये यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाहीये. कारण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. बरं एवढंच नव्हे तर यांन गायीचं आयुष्यही देखील वाढतं, असा दावा तिथल्या लोकांनी केला आहे.

बर गायींच्या पोटाला याप्रकारे छिद्र फक्त अमेरिकेत पाडले जाते असे नाही तर इतर बऱ्याच वेगवेगळ्या देशातही गायींच्या पोटाला अश्याप्रकारे छिद्र पाडलं जातं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढं पोटाला छिद्र पाडून देखील गायींना कोणतीही समस्या किंवा अडचण न येता त्या जगतात. आहे का विषेशच.

पोर्टिया टफ्ट्स नामक एका विश्वविद्यालयातील एक गाय तर 2002 पासून पोटावर छिद्र घेऊन जगत आहे. आता हे छिद्र काहीतरी उद्देशाने गायीच्या पोटावर असे पाडले जात असेल. हा उद्देश म्हणजे वैज्ञानिक गायीच्या पचनतंत्राचा अभ्यास करू शकतील.

तसेच अमेरिकेत शेतकरी नेहमी गायीच्या पोटात छिद्र करतात. अमेरिकेतील शेतकरी असं गायींच्या पोटाची स्वच्छता करण्यासाठी करतात. कारण शेतकरी गायींना चरण्यासाठी मोकळं सोडतात. अशात गायी प्लास्टिकच्या पिशव्या खातात आणि त्याने त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. तेव्हा या छिद्रातून हात टाकून पोट साफ केलं जातं.

गायीच्या पोटाला हे छिद्र पाडले जाते. त्या प्रक्रियेला फिस्टूला किंवा कॅन्यूला असं म्हटले जाते. गायीच्या पोटावरील या छिद्राला नंतर प्लास्टिकने झाकून टाकले जाते. जेणेकरून त्यात घाण जाऊ नये. जेव्हा पोट साफ करायचं असेल तेव्हा ते हात घालून प्लास्टिक बाहेर काढतात.

अमेरिकेत गायींच्या पोटावर छिद्र सर्जरी दरम्यान केलं जातं. या सर्जरीत गायीच्या पोटाला इजाही होत नाही आणि याने सर्जरीने त्यांच्या आयुष्यावरही काही परिणाम होत नाही.

एका रिपोर्टनुसार, ही प्रक्रिया आताची नाही तर १९२० पासून केली जात आहे. कॅन्यूला सर्जरी दरम्यान गायीच्या पोटात टाकला जातो आणि नंतर गायीला ४ ते ६ आठवडे आराम दिला जातो. नंतर गाय पूर्णपणे फिट राहते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate