डुप्लीकेट सलमान खानला रस्त्यावर रील तयार करणं पडलं महागात, पोलिसांनी केली अटक

डुप्लीकेट सलमान खानला रस्त्यावर रील तयार करणं पडलं महागात, पोलिसांनी केली अटक

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची क्रेझ तरुणाईला आजही भुरळ घालते. ओरिजिनलनंतर डुप्लिकेट सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर लोकांमध्ये त्याची लोकप्रियता देखील काय कमी नाही.

डुप्लिकेट सलमान खान हा लखनऊमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याची फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी तो अनेकदा शहरातील रस्त्यांवर व्हिडीओ रील्स बनवताना दिसतो, पण यावेळी त्याला व्हिडीओ रील बनवणे महागात पडले आहे. शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी डुप्लिकेट सलमान खानला अटक केली आहे. डुप्लिकेट सलमानचे खरे नाव आझम अन्सारी आहे.

घंटाघरवर रील बनवत असतांना लखनऊ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. डुप्लिकेट सलमान खान रस्त्यावर एक व्हिडिओ रील बनवत होता. डुप्लिकेट सलमान खानला पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. आणि त्यामुळे तिथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आणि चक्काजाम होईल परिस्थिती निर्माण झाली.

त्रस्त लोकांनी केली पोलिसांकडे तक्रार

व्हिडीओ रील बनवल्यामुळे रास्ता जाम झाला होता. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर ठाकूरगंज पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घंटाघर येथे व्हिडिओ बनवताना डुप्लिकेट सलमान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याला ठाकूरगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. डुप्लिकेट सलमानवर कलम १५१ अंतर्गत शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

डुप्लिकेट सलमानची फॅन फोल्लोविंग मोठी

डुप्लिकेट सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तो अनेकदा रील करतांना दिसतो. शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी डुप्लिकेट सलमानला दंड ठोठावला आहे. डुप्लिकेट सलमान खानचे यूट्यूबवर 1 लाख 67 हजार फॉलोअर्स आहेत.

Aniket Ghate