अभिनेत्रीने स्तनपान करतानाचा फोटो पोस्ट केला म्हणून केल्या वाईट कमेंट, पहा फोटो!!

अभिनेत्रीने स्तनपान करतानाचा फोटो पोस्ट केला म्हणून केल्या वाईट कमेंट, पहा फोटो!!

मातृत्त्वाच्या प्रवासामध्ये एका महिलेला बऱ्याच प्रसंगांचा परिस्थितींचा सामना करावा लागतो. मुळात एका बाळाला जन्म देण्यासाठीही पूर्ण प्रक्रिया महिलेला नव्यानं जन्माला घालत असते. फक्त बाळाचाच नाही, तर हा त्या महिलेचाही जन्म असतो.

सध्या याच साऱ्यातून पुढे येत मातृत्त्वाचा अनुभव घेणाऱ्या एका अभिनेत्रीकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अभिनेत्री तिचे अनुभव चाहत्यांशी शेअर करताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे एव्हलिन शर्मा. तुषार भिंडी याच्याशी लग्नबंधनात अडकल्यानंतर एव्लिननं तिच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं.

हल्लीच कलाजगतापासून दूर असणाऱ्या या एव्हलिननं तिच्या लेकिला स्त न पान करतानाचा एक फोटो पोस्ट केला. प्रत्येक आईच्या मनातील भावनाच जणू तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिली. ‘जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुम्ही एक वेळापत्रक ठरवलंय तेव्हाच तिचं क्लस्टर फिडिंग सुरु होतं’.

एव्हलिनं पोस्ट केलेल्या या फोटोंवर काहींनी अतिशय सुरेख कमेंट केल्या. एक आई म्हणून आम्हाला तुथा आदर वाटतो अशाही कमेंट केल्या. पण, काहींनी मात्र मर्यादा सोडून कमेंट करत विचारशक्ती किती संकुचित आहे याचीच प्रचिती दिली.

समाजातील संकुचित विचारसरणी असलेल्या या मंडळींच्या कमेंट्सचा अर्थातच एव्हलिनला काही फरक पडत नसणार. पण, एक स्त्री, महिला म्हणून मात्र अनेकांनाच अशा विचारसरणीवर संताप व्यक्त करावासा वाटला असणार यात शंका नाही.

Team Hou De Viral