अंकिता लोखंडे’ नव्हे तर ही ‘ग्लॅमरस’ मराठमोळी अभिनेत्री झळकणार ‘एकता कपूर’ च्या मालिकेमध्ये

अंकिता लोखंडे’ नव्हे तर ही ‘ग्लॅमरस’ मराठमोळी अभिनेत्री झळकणार ‘एकता कपूर’ च्या मालिकेमध्ये

छोटा पडदा म्हणजेच टीव्ही. यावर काही प्रॉडक्शन हाऊसची कायम वर्षं चलती आहे. कारण की हे प्रोडक्शन हाऊस खूप मोठ्या प्रमाणात मालिका बनवत असतात. या मालिकांमध्ये कलाकार देखील खूप मोठ्या प्रमाणात लागतात. या मालिकामध्ये काम करून अनेक कलाकार हे खूप मोठे झालेले आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे घेऊ शकतो.

एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून त्याने छोटा पडदा वर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये देखील संधी मिळाली यशस्वी अभिनेता म्हणून नावारूपास येत असताना त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. यामध्ये त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिचे नाव देखील आल होते. त्याचप्रमाणे रिया चक्रवर्ती हिची देखील चौकशी झाली. त्याचप्रमाणे या प्रकरणात इतर कनेक्शन देखील समोर आले. सुशांत याच्या जाण्याने यामुळे चित्रपट सृष्टीसह मालिका विश्व ढवळून निघाले.

कारण सुशांत याने मालिकांमध्ये देखील काम केले होते. एकता कपूर ही अशी निर्माती आहे की, जिने आजवर अनेक मालिकांची निर्मिती केली आहे आणि अनेकांना सुपरस्टार केले आहे. एकता कपूर हिने सगळ्यात आधी म्हणजे काही वर्षांपूर्वी झी टीव्हीवर हम पाच ही मालिका तयार केली होती. या मालिकेत अशोक सराफ दिसले होते. तसेच या मालिकेत विद्या बालन हेदेखील दिसली होती. पुढे चालून विद्या बालन हिने एकता कपूरच्या डर्टी पिक्चर या चित्रपटात काम केले होते.

त्यानंतर एकता कपूर ने’ क्यू की सास भी कभी बहू थी या मालिकेत स्मृती इराणी दिसल्या होत्या. स्मृती इराणी यांना या मालिकेने खूप मोठ्या उंचीवर नेऊन पोहोचवले. त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांत काम केले. मात्र, कालांतराने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्या भाजपच्या सरकारमध्ये मोठ्या मंत्री आहेत. आता त्या मालिकांमध्ये काम करताना दिसत नाहीत. मात्र मालिकांत आपल्याला खूप आस्था असल्याचे त्या सांगत असतात.

त्याच प्रमाणे एकता कपूरने ‘कसोटी जिंदगी की’, ‘पवित्र रिश्ता’ यासह अनेक मालिका बनवल्या. अनेक टेलिव्हिजन चॅनलवर त्यांच्या मालिका या प्रसारित होत असतात. सध्या अंकिता लोखंडे ही पवित्र रिश्ता चा भाग दोन मध्ये काम करत आहे. त्यामुळे तिला आता सध्या अधिक वेळ भेटत नाही.एकता कपूर आता नवीन एक मालिका तयार करणार आहे. या मालिकांमध्ये एक मराठमोळा चेहरा दिसणार आहे. ही मालिका झी टीव्हीवर तीन ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

या मालिकेचे नाव भाग्यलक्ष्मी असे आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर हिने केली आहे. या मालिकेत ऐश्वर्या खरे हा मराठमोळा चेहरा दिसणार आहे. याआधी ऐश्वर्या हिने अनेक मालिकांत काम केलेले आहे. जाने क्या होगा, रमा रे ही मालिका चांगलीच गाजली होती.

साम-दाम-दंड-भेद ही मालिकाही ऐश्वर्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिट केली. त्यामुळे आता एकता कपूर आपल्या आवडत्या अभिनेत्री ला सोडून एक मराठमोळ्या चेहऱ्याला संधी देताना दिसत आहेत. त्यामुळे ऐश्वर्या खरे ही मालिका आता कशी गाजवून सोडते ते पाहावे लागेल.

Team Hou De Viral