दुकानांच्या पाट्यांवरील नावाच्या अगोदर ‘मे.’ या शब्दाचा उल्लेख केला जातो…त्याचा काय अर्थ असतो

दुकानांच्या पाट्यांवरील नावाच्या अगोदर ‘मे.’ या शब्दाचा उल्लेख केला जातो…त्याचा काय अर्थ असतो

दुकानाच्या पाटीवर आपण नेहमी मेसर्स अशी सुरवात असणारी दुकानाची नावे पहातो त्याचा मतितार्थ हे व्यापार उद्योग एकापेक्षा अनेक लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले असतात.

मेसर्स Messrs हा शब्द मिस्टर Mister या शब्दाचे बहुवचन आहे. Mister चा संक्षेप Mr. आणि Messrs. चा संक्षेप M/s असा लिहीतात. मराठी देवनागरी लिपीत फक्त ” मे. ” असे लिहीतात मिस्टर Mister्याचा मराठीत अर्थ सज्जन ,सद्गृहस्थ, श्रीमान असे आदरार्थी संबोधन आहे

बहुतेक दुकाने व्यापारी पेढ्या एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या मालकी अथवा भागीदारीच्या असतात त्यामुळे दुकानाची व्यापाराची नावे मेसर्स अशा बहुवचनी नावाने सुरु होतात. दुकानांचे, उद्योगांचे, मालक भागीदार मंडळीचा सहभाग सूचित करण्यासाठी कायद्या प्रमाणे ही अशी वैध व्यापारी नावांची पद्धत आहे.

मेसर्स Messrs. शब्दाचा मागोवा घेतल्यास हा शब्द मिस्टर Mister या शब्दाचे बहुवचन आहे असे समजते. पुरुषांना मिस्टर म्हणायचे ते एक आदरार्थी संबोधन असे. आपण श्रीमान म्हणतो. या मिस्टर चे संक्षिप्त रूप Mr. असे वापरले जाते. त्याच प्रकारे मेसर्स. Messrs./मिस्टर्स Misters चे संक्षिप्त रूप “मे.”अथवा “M/s” असे वापरात आहे.

खरे पाहता इंग्रजीतील Messrs. हे फ्रेंच शब्द Messieurs चा इंग्रजी संक्षेप Messrs. आहे. तो कधी टिंबाबरोबर Messrs. असा किंवा बहुदा टिंबा शिवाय म्हणजे Messrs असाच लिहीतात.

(*) मिस्टर Mister > Mr. संक्षिप्त रूप

(*) मिस्टर Mister चे बहूवचन > Misters / Messrs. मेसर्स

(*) मेसर्स Messrs चे >”मे.”अथवा “M/s” संक्षिप्त रूप ; सर्वश्री= मेसर्स

Aniket Ghate