खाण्यायोग्य डिंकाचा नेमका आपल्या शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या फायदे

खाण्यायोग्य डिंकाचा नेमका आपल्या शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या फायदे

डिंका मधे खुप पौष्टिक व औषधी गुणधर्म असतात. डिंक म्हणजे झाडाचा चिक किंवा पाणी असते. ते खोड़ातून बाहेर येते. आणि ते वाळवून डिंक तयार हा तयार केला जातो. एवढे मोठे झाड एकसंघ, मज़बूतीने बांधून ठेवन्याचे काम गोंद, डिंक करीत असतो. म्हणून बाळंतिणीला डिंका चे लाडू देण्याची पद्धत आहे. त्यामुळे शरीरात शक्ति, मजबूती येते.

डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग फार पूर्वीपासून पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी वापरण्यात येतो. डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादनं, एनर्जी ड्रिंक आणि आइसक्रिम्स इत्यादींमध्ये प्रयोग करण्यात येतो.

डिंक गरम असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. अनेकदा घराघरांमध्ये डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात. डिंकात असलेल्या गरम गुणधर्मांमुळेच हे मुख्यतः हिवाळ्यात तयार केले जातात. त्याचप्रमाणे डिंक खाल्यामुळे शरीरिला कॅलरी मिळतात.

डिंक खाण्याचे फायदे :

डिंकाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही डिंकाबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.

भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे त्वचेची काळजी घेण्यासाठी ओळखलं जातं.

डिंक रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याची पौष्टीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये बदामाची पावडर आणि दूधही तुम्ही मिक्स करू शकता. दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

शरीराची झीज व जखम भरून काढण्याचे काम डिंक करतो. त्यामुळे बऱ्याच काही भागात हिवाळयात घरोघरी डिंका चे लाडू बनवून खाल्ले जाताय. त्यामुळे प्रतिकार शक्ति वाढते. आणि बलदायी, मजबूत शरीर यष्टि बनते. व स्नायुना बळकटी येते. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा डिंक असतो.

प्रत्येक झाडाचे गुणधर्म त्या त्या झाड़ाच्या डिंकात आलेले असतात. उदा. खैर,धामोडी, साग, पळस, बोरी, बाभळी, कडुलिंब या झाडांच्या डिंका मधे खुप औषधी गुणधर्म असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.Com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Aniket Ghate