लग्न झालेले असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत सनी देओलचं चालू होतं ‘लफडं’, त्या अवस्थेत बायकोने…

लग्न झालेले असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत सनी देओलचं चालू होतं ‘लफडं’, त्या अवस्थेत बायकोने…


अभिनेता सनी देओलचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. बॉलिवूडमध्ये स्थिरावल्यानंतर त्याचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं. इतकंच नव्हे तर सनीचं इतर अभिनेत्रींशी असलेलं नातं त्याच्या पत्नीपर्यंतदेखील पोहोचलं होतं. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग तर सनीच्या प्रेमात पडली होती.

सनी-अमृताच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चाही तेव्हा रंगल्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री डिंपल कपाडियाशी सनीचं नाव जोडलं गेलं. ‘बेताब’ चित्रपटाद्वारे सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये अमृतादेखील मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनी-अमृता एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या.

पण सनीचं आधीच लग्न झालं होतं याची अमृताला कल्पना नव्हती. पण सनीच्या वैवाहिक आयुष्याबाबत जेव्हा तिला कळालं तेव्हा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. डिंपल कपाडिया यांच्याबरोबर सनीचं असणारं रिलेशनशिप तर तेव्हा प्रचंड गाजलं. डिंपल-सनीने ‘नरसिम्हा’, ‘गुनाह’, ‘अर्जुन’, ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोला’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. इतकंच नव्हे तर तेव्हा डिंपल यांचंही तेव्हा लग्न झालं होतं. पण आपापलं वैवाहिक आयुष्य सुखी राहण्यासाठी या दोघांनी लग्न केलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल यांच्या दोन मुली ट्विंकल व रिंकी तेव्हा सनीला ‘छोटे पापा’ म्हणून हाक मारायचे. सनीची पत्नी पूजाला जेव्हा या दोघांच्या नात्याबाबत समजलं तेव्हा तिने मोठा निर्णय घेतला होता.

डिंपल यांच्याबरोबर तुम्ही अधिक जवळीक साधली तर मुलांना घेऊन मी घरातून निघून जाईन आणि तुमच्यापासून आम्ही लांब होऊ असं सनीच्या पत्नीने सांगितलं. मात्र त्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून दूर राहणंच पसंत केलं.

Aniket Ghate