बापरे!!!दीपिका पदुकोण करणार खलनायकाची भूमिका!!

बापरे!!!दीपिका पदुकोण करणार खलनायकाची भूमिका!!

हिंदी चित्रपसृष्टीतील सगळ्यात सुप्रसिद्ध ‘धूम’ च्या निर्मात्यांनी एक नवीन भाग बनविण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता न निवडता एक अभिनेत्री निवडण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. तर, जाणून घेऊयात कोणती अभिनेत्री या चित्रपटात खलनायक साकारणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘धूम ४’ च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी दीपिकाचा विचार केला आहे. दीपिका ला संपर्क करताच ती या भूमिकेबद्दल खूप उत्साही असल्याचे समजते. चित्रपट साइन करण्यापूर्वी ती उपलब्ध असलेल्या तारखांचा विचार करणार आहे असे चर्चेत आहे. ‘धूम’ सीरिजचे सर्व चित्रपट त्यांच्या कथा आणि चित्रीकरणाच्या ठिकाणांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.

अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा प्रत्येक धूम चित्रपटात दिसले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात हृतिक रोशन तर तिसऱ्या भागात आमिर खानने खलनायकाची भूमिका साकारली. त्यामुळे पुढील भागात एका स्त्री खलनायकाला बघणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे कारण ठरणार आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता जॉन अब्राहम सोबत ती दिसणार आहे. त्या बरोबर, शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात अनन्या पांडे व सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. शिवाय, ती कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ मध्ये पती रणवीर सिंह सोबतही झळकणार आहे.

Aniket Ghate