म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या हेल्मेटवर ‘तिरंगा’ नसतो, यामाघील कारण जाणून तुम्हालाही धोनीबद्दल आदर निर्माण होईल !

म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या हेल्मेटवर ‘तिरंगा’ नसतो, यामाघील कारण जाणून तुम्हालाही धोनीबद्दल आदर निर्माण होईल !

भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय क्रिकेट कंट्रोल मंडळाचा लोगोसह तिरंगा देखील आहे. परंतु तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा हा नसतो.चला तर या मागचं कारण जाणून घेऊया..

सामना पाहताना बर्‍याचदा दर्शकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की धोनी असे का करत असेल? आणि शेवटी, महेंद्रसिंग धोनीने आपल्या हेल्मेटवर इतर खेळाडूंप्रमाणे तिरंगा का नाही याबद्दल सांगितले. तर इतर खेळाडूंप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा लोगोही त्याच्या हेल्मेटवर आहे. आता यामागील कारण समोर आले आहे. ह्या खुलास्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या मनात धोनीबद्दल अधिक आदर वाढला आहे.

माहीची गोष्टच वेगळी आहे –

माहीचे गोष्ट विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन किंवा इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळी आहे. धोनी हा फलंदाज तसेच विकेटकीपर आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की विकेटकीपिंग दरम्यान जेव्हा फिरकीपटू येतो तेव्हा धोनी आपले हेल्मेट काढतो आणि जमिनीवर ठेवतो. तसेच, धोनी फलंदाजी करतानाही असेच करतो.

हेल्मेटवर तिरंगा नसण्याचे हे कारण –

जेणेकरुन राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होऊ नये या कारणास्तव धोनी आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावत नाही. तिरंगा जमिनीवर ठेवून त्याचा अपमान होऊ नये, म्हणून धोनी त्याच्या हेल्मेटवर झेंडा लावत नाही. धोनी हे राष्ट्रध्वजाबद्दलच्या सन्मानामुळे असे करतो.

महत्त्वाचे म्हणजे धोनीची सुरुवातीपासूनच भारतीय सैन्याशी खोल जोड होती. क्रिकेटपटू होण्यापूर्वी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते. तो सध्या भारतीय क्रिकेट सोबत भारतीय आर्मीशी देखील संबंधित आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate