वास्तु टिप्स : धन लाभासाठी या ‘वास्तु’ नियमांचे करा पालन, राहणार नाही पैशाविषयी चिंता

वास्तु टिप्स : धन लाभासाठी या ‘वास्तु’ नियमांचे करा पालन, राहणार नाही पैशाविषयी चिंता

माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पैसा ही आहे, माणूस दिवस – रात्र अधिकाधिक पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक संभाव्य प्रयत्न करतो. परंतु इतके प्रयत्न करूनही पैसे मिळत नाही, जर तुमच्या आयुष्यात सुद्धा पैशाशी संबंधित काही समस्या चालू असतील तर तुम्ही वास्तुशास्त्रातील काही नियमांचे पालन करू शकता.

खरतर, वास्तुशास्त्रामध्ये आयुष्यातील अनेक समस्यांना दूर करण्यासाठी उपाय सांगितले गेले आहेत. जर तुम्ही वास्तु नियमांचे पालन करता तर यामुळे तुमच्या घरात सुख व शांती राहिल, एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्या सुद्धा दूर होऊ शकतात.

वास्तुच्या या नियमांचे करा पालन

जर तुम्ही गुरुवारी उत्तर दिशेकडे कमळाचे फुल ठेवत असाल यामुळे तुमच्या संपत्तीत वेगाने वाढ होते आणि धनाची देवी आई लक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहील.

जर तुम्ही दररोज तुमच्या घरातील दक्षिण पूर्व दिशेकडे कापूर लावलं तर यामुळे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता ही वाढते.

जर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून वाचायचे असेल तर तुम्ही एका गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की तुम्ही तुमच्या घरातील मुख्य द्वार हे दक्षिण दिशेकडे नाही बनवले पाहिजे कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या नेहमी राहतील, म्हणून शक्य होईल तेवढे दक्षिण दिशेकडे तुमचे मुख्य द्वार आणू नये.

जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवायची असेल आणि धन लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या घरातील ईशान्य दिशेकडे म्हणजेच उत्तर पूर्व दिशेमध्ये सातच्या संख्येमध्ये क्रिस्टल ठेवावा.

जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी घराची साफ सफाई करण्याचे ठरवले असेल तर मग तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनू शकते.

तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की तुम्ही तुमच्या शयनकक्षात पाण्याने भरलेले भांडे नाही ठेवावे, कारण यामुळे तुमच्यावरील कर्ज वाढते आणि तुम्ही उधारीमध्ये अजूनच फसून जाता.

जर तुम्हाला तुमच्या घरातील पैशाशी संबंधीत समस्येपासून मुक्त होयचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील उत्तर दिशेकडे पुष्प नक्षत्रात पूजा करून तिथे कनकधारा यंत्र स्थापित करावे, यामुळे संपत्तीत वाढ होते.

वास्तुशास्त्रानुसार दररोज घरात फरशी पुसताना तुम्ही पाण्यात आठवणीने थोडीशी हळद टाकावी यामुळे तुम्हाला फायदा मिळू शकतो

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की तुम्ही तुमच्या घरी प्लास्टिक चे फुले व झाडे ठेऊ नये, कारण यामुळे घरात गरिबी येते आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव हा जलद गतीने वाढतो.

तुम्ही रात्रीच्या वेळी जेवण केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात उष्टी भांडे ठेऊ नये कारण यामुळे व्यापारात हानी होऊ शकते, तुम्ही रात्रीच सर्व भांडे धुवून ठेवावे आणि स्वयंपाक घराला स्वच्छ ठेवावे.

जर तुम्ही दक्षिण दिशेकडील भिंतीकडे धनाची तिजोरी ठेवली तर यामुळे तुमच्या घरातील संपत्तीत सतत वाढ होऊ शकते, जो व्यक्ती काहीही विचार न करता कुठेही तिजोरी ठेवत असेल तर त्यांची संपत्ती ही लगातार कमी होत जाते. म्हणून तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate