देवघरात देवपूजा संबंधित हे 10 नियम : नक्की त्याचे पालन करा ; देव स्वतः तुम्हाला दर्शन देतील!

देवघरात देवपूजा संबंधित हे 10 नियम : नक्की त्याचे पालन करा ; देव स्वतः तुम्हाला दर्शन देतील!

मित्रांनो, आपण आपल्या देवघरामध्ये आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने देवपूजा करत असतो आणि ती देवपूजा देवाला मान्य आहे की नाही हे आपण पाहत नाही. आपण देवपूजा मध्ये काही चुकीचे केले आहे का तेही आपल्याला माहीत नसते. आपण देवघरांमध्ये जे देव असतात त्यांचे व्यवस्थित पूजा देखील करत नसतो. आपल्याला ते माहिती नसते की देवपूजा कशी करावी? आपल्याला त्याचे पालन कसे करावे? त्याचे नियम काय? या गोष्टी आपल्याला माहित नसतात.

देवघरामध्ये आपण देवाची पूजा करतो. देवांना आपण व्यवस्थितपणे धुवून घेऊन त्यांना व्यवस्थितपणे लावून त्यांना हळदी कुंकू लावतो व त्यांना फुल वगैरे घालून आपल्या देवासमोर आगरबत्ती आणि दिवा लावून देवासमोर आपण नमस्कार करतो. आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचा देवासमोर आपण आग्रह करतो. आपल्या घरामध्ये सर्व सुख शांती रहावी, आपल्या घरामध्ये कोणती अडचणी येऊ नये व आपल्या पोरा बाळांना नोकरीची संधी लागू दे घरामध्ये कोणतीही वाईट वस्तू किंवा वाईट काळ येऊ नये.

घरामध्ये आपल्याला कोणत्याही बाबतीत वाईट काळ यायला नको यासाठी आपण देवघरामध्ये देवाची पूजा करत असतो. देव ही त्यांना जशी आपली लोकांनी पूजा केली आहे तसेच फळही देव तसेच देतो. त्यामुळे आपण देवपूजा ही चांगली केली पाहिजे व देवाला प्रसन्न केले पाहिजे. आपण देवपूजा घरामध्ये प्रसन्नता करायची आहे व देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून मग आपण देवाला नमस्कार करून दहा मिनिट आपल्याला पाहिजे त्याचे नामस्मरण करून नमस्कार करायचा आहे. तर देवपूजा करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत ते पाहूया..

मित्रांनो 1)तुळशीचे पान हे असे पान आहे की ते आपण दहा दिवस ठेवले की ते खराब होत नसते व आपण ते पाणी मारून देवासमोर ठेवले तरी चालतात व तुळशीचे पाने नैवेद्य दाखवायला ही आपण वापरू शकतो.

2) दिवा देवासमोर परमेश्वराच्या समोर बरोबर ठेवायचा आहे. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रंगाचा कापसाचा गोळा करून लावावा व तेलाचे दिव्यासाठी लाल धाग्याचा गोळा वापरावा.

3) देवपूजा झाल्यानंतर तुटलेला दिवा किंवा तुटलेली अगरबत्ती असू दे किंवा कोणतीही गोष्ट वापरू नये. देवाला ती मान्य नसते व आपल्या घरात देवपूजाच्या संबंधित कोणतीही गोष्ट तुटलेली किंवा फुटलेली आपण वापरू नये.

4) आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीवर बेल असतात ते बेल आपल्या देवघरामध्ये सर्व देवांना घातले तरी चालते व आपण कोणत्याही सोमवारी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन बेलपत्र शंकराच्या पिंडीवर अवश्य घालावे.

5) आपल्या देवघरामध्ये आपली पूजा झाली असेल, आपला नैवेद्य दाखवून झाला असेल, आपली पूजा अर्चना झाली असेल तर आपण देवाला आपल्या इच्छेनुसार काही दक्षिणा ठेवली तर आपल्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. आपल्या इच्छानुसार दक्षिणा देवघरामध्ये जरूर ठेवावी.

6) मित्रांनो प्रत्येक देवघरामध्ये आपल्या आरतीच्या ताटामध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्या आरतीच्या ताटामध्ये ते तांदूळ असणं आवश्यक आहे व पूजेमध्ये अखंड तांदूळ वापरावे. तुटलेले तांदूळ वापरू नये आणि देवपूजामध्ये तांदूळ आणि हळद असे मिक्स करून देवाला अर्पण केले तर अति उत्तम.

7) देवघरामध्ये पूजेसाठी आपण पानाचा विडा जरूर ठेवावा. बेलपत्र, लवंग, तांदूळ, हळद आणि एक सुपारी असा विडा तयार करून आपल्या पूजेच्या आरतीमध्ये मधोमध ठेवायचा आहे. असे ठेवला तर अति उत्तम आरती चालू असताना आपला दिवा मधेच कधीही विजू देऊ नका. याकडे जरूर लक्ष द्यावे.

8) कोणत्याही देवाची पूजा करताना हळद, कुंकू ,तांदूळ ,आरती हळकुंड,पाने,विडा,सुपारी,पूजा, आसन,स्नान, धूप, दीप, कुमकुम चंदन,फुले,प्रसाद इत्यादी वस्तूंना आमंत्रित करणे आवश्यक आहे.

9) भगवान शंकराच्या पिंडीला किंवा शंकरांना हळद अर्पण करू नये व त्यांच्या पिंडीला शंखातून स्नान किंवा पाणी घालू नये.

10) आपण आपल्या देवघरामध्ये जेथे पूजा करतो तेथे स्वच्छता नक्की ठेवावी. देवघरामध्ये पूजा अर्चना करत असताना कोणत्याही मनामध्ये वाईट गोष्ट घ्यायच्या नाहीत. नामस्मरण करत राहायचे व देवपूजा करताना आपल्या मनामध्ये आपल्याला येईलतो स्तोत्र बोलत देवपूजा करायची आहे.

तर मित्रांनो असे होते हे काही दहा नियम. जे आपण देवपूजा करीत असताना पाळायचे आहेत. जर तुम्हाला देखील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, अडचणी येऊ नयेत असे वाटत असेल तर देवपूजा करताना हे नियम अवश्य पाळा. त्यामुळे परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Hou De Viral