देवावर लावलेले फुल आपल्यासमोर पडले तर काय करावे?

देवावर लावलेले फुल आपल्यासमोर पडले तर काय करावे?

मित्रांनो बऱ्याच सेवेकऱ्यांचा असा एक प्रश्न आहे, की ज्यावेळी आपण घरामध्ये देवपूजा करतो. त्यावेळी देवांना फुले अर्पण करत असतो. तसेच मोठ्या मंदिरात देखील आपण देवांना फुले घालतो. आणि ही देवांच्या डोक्यावर घातलेली फुले किंवा जो हार आपण देवांना घातलेला आहे. त्यातील फुल आपल्या डोळ्यासमोर पडले तर त्या फुलाचे काय करावे.

ज्यावेळी आपण देवांच्या मूर्तीला किंवा फोटोला फुले घालतो, हार घालतो. आपण जी फुले देवांना देवींना घातलेली आहेत. ती फुले त्या आहारातून किंवा त्यांच्या डोक्यावरून खाली पडले. तर तर त्या फुलाचे काय करावे. सगळ्यात प्रथम ही गोष्ट लक्षात असायला हवी, की ज्यावेळी देवाची फुल त्यांच्या डोक्यावरून किंवा हातावरून खाली पडते. त्यावेळी ती एक शुभ घटना असते किंवा शुभ संकेत असतात.

आपल्याला आपल्या वालवडला असे सांगितले आहे. की देवाचे फुल जर खाली पडले तर तो आपल्याला देवाने दिलेला आशीर्वाद आहे. आणि त्यांची आपल्यावर कृपा आहे. बरेच जण हे पडलेले फुल आपल्या तिजोरी मध्ये ठेवतात. ही गोष्ट चांगलीच आहे. कारण तो देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून ते फुल तिजोरी मध्ये ठेवतात ही गोष्ट चांगली आहे. मात्र असा नियम आहे.

की देवांच्या डोक्यावरून पडलेले फुल किंवा हारामधून पडलेले फुल तिजोरी मध्ये न ठेवता. त्या फुलाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. आपण हे फुल विहिरीमध्ये तलावामध्ये जे पाणी स्वच्छ आणि चांगले आहे. त्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. आपण जर हे फुल तिजोरी मध्ये ठेवले तर ते फुल तिजोरी मध्येच वाळून जाते. आणि ते कुजते आणि ते फुल खराब होऊन जाते.

आणि ते फुल जर अशा पद्धतीने खराब झाले तर तो अपमान समजला जातो. आणि आपल्याकडून त्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याला पाण्यामध्ये प्रवाहित करावे. ज्यावेळी देवांचे फुल मस्तकावरून किंवा हरामधून खाली पडते. त्यावेळी तो देवांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. असे समजायचे आहे. आणि त्या फुलाला नमस्कार करून त्या फुलाचा देखील आपण आशीर्वाद घ्यायचा आहे.

त्यानंतर ते फुल वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. आपल्याला त्या फुलाचे विसर्जन पाण्यामध्ये त्याच वेळी करणे जमत नसेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या सवडीने ते फुल वाळण्याआधी आणि कुजण्याआधी पाण्यामध्ये सोडायचे आहे. अशा पद्धतीने आपण जर देवांच्या पुष्पहारातून किंवा डोक्यावरून पडलेल्या फुलाचे अशा पद्धतीने विसर्जन करू शकतो.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका 

Team Hou De Viral