रोज सकाळी देवपूजा करताना देवांच्या मूर्तींचे असे करा स्नान घरात सुख-समृद्धी नांदेल

रोज सकाळी देवपूजा करताना देवांच्या मूर्तींचे असे करा स्नान घरात सुख-समृद्धी नांदेल

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये दररोज सकाळी देवपूजा केली जाते देवांना अंघोळ घातली जाते. ज्यावेळी आपण देवांच्या मूर्ती पाण्याने धुवत असतो. किंवा त्यांना अभिषेक घालतो तर तो अभिषेक या पद्धतीने घाला म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी येईल.

आपण सर्वजणच सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत असतो मात्र सकाळची पूजा ही खूप खास असते. कारण यावेळी आपण देवांना आंघोळ घालून म्हणजेच अभिषेक घालून त्यांची पूजा करत असतो. सकाळची केलेली देवपूजा ही खूप खास आणि विशेष असते कारण ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो.

त्यावेळी आपले देवघर आपण स्वच्छ करतो. देवांना बसण्यासाठी ठेवलेले आसन बदलत असतो. आणि देवारा स्वच्छ पुसून देवांना अंघोळ घालून पुन्हा त्यांची परत आपण देवपूजा करतो त्यामुळे तेथील वातावरण शुद्ध व प्रसन्न राहते. आणि बऱ्याच वेळेला सेवेकऱ्यांना भक्तांना असा प्रश्न पडतो.

की देवांना आंघोळ कशा पद्धतीने घालावी. त्यांचा अभिषेक कसा करावा असे वेगवेगळे प्रश्न पडतात. आपण आजच्या या लेखामध्ये देवांना स्नान कसे घालावे त्यांचे अभिषेक कसे करावे. याबद्दलची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. देवांना अभिषेक घालण्यासाठी पंचामृत घ्यावे पंचामृत नसेल तर दूध घेतले तरी चालते.

शक्यतो पंचामृतच घ्यावे. देवांना अभिषेक करण्यासाठी पण दररोज पंचामृत करणे शक्य नसते, त्यामुळे दूध घेतले तरी चालते. दूध किंवा पंचामृत घेऊन आपल्या देवारातील देव एका ताटामध्ये किंवा सामनामध्ये घ्यायचे आहेत. यामध्ये देवांच्या मूर्तीच घ्यायचे आहेत. देवींच्या मूर्ती अभिषेकासाठी घ्यायच्या नाहीत.

फक्त देवांनाच आपण अभिषेक घालणार आहोत. आयुष्य घालण्यासाठी आपण दूध किंवा पंचामृत जे काही घेतले आहे. ते एक एक चमचा प्रत्येक मूर्तीवर आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर कोमट पाणी घेऊन सर्व मूर्तींवर एक एक चमचाभर ते कोमट पाणी घालून त्या सर्व मूर्ती पुन्हा धुवायचे आहेत. आणि मग स्वच्छ पाणी घेऊन सर्व मूर्ती त्या स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवायचे आहेत.

सर्व देवांच्या मूर्तींना स्वच्छ पाण्याने स्नान घालून झाल्यानंतर सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून त्यांना त्यांच्या आहे. त्या ठिकाणी पुन्हा स्थापन करायच्या आहेत. देवांच्या मूर्तींना अभिषेक किंवा आंघोळ घालून झाल्यानंतर पुन्हा सर्व देवींच्या मूर्ती ताटामध्ये घ्यायचे आहेत. त्यांना देखील अभिषेक घालायचा आहे.

मग तो दुधाचा चालेल. किंवा पंचामृताचा अभिषेक असला तरी चालतो. त्यानंतर कोमट पाण्याने पुन्हा मूर्ती धुवायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. स्वच्छ कापडाने पुसून देवींच्या मूर्ती देखील त्यांच्या ठिकाणी त्यांना स्थापन करायचे आहेत.

मित्रांनो एक गोष्ट मात्र आपल्याला यावेळी लक्षात ठेवायचे आहे. की देवी आणि देवतांची मूर्ती एकत्र करून त्यांना अभिषेक किंवा स्नान घालायचे नाही. एक वेळेस देवींच्या मूर्ती घेऊन त्यांना स्नान किंवा अभिषेक घालायचा आहे. आणि नंतर देवांच्या मूर्ती घेऊन त्यांना स्नान किंवा अभिषेक घालायचा आहे. दोन्ही मूर्ती एकत्र घेऊन स्नान किंवा अभिषेक घालायचा नाही.

वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे देवी किंवा देवांचे स्नान जर आपण घातले तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी बरकत सर्व काही येईल. मात्र एवढे लक्षात ठेवायचे आहे. की देवी आणि देवतांच्या मूर्तीला एकाच वे स्नान किंवा अभिषेक घालायचं नाही.

अशा पद्धतीने अभिषेक घालून मगच देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवून त्यांना हळदीकुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे. अशा पद्धतीने जर आपण देवी आणि देवतांना स्नान किंवा अभिषेक घातला तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam