…म्हणून डाव्या हातात घड्याळ ही घातली जातात !

आपल्या सर्वानाच हातात घड्याळ घालण्याची खूप आवड असते आणि असूही का नाही कारण हातात घड्याळ असणे म्हणजे एकप्रकारे स्टाईल स्टेटमेंटचा नएक भाग आहे. घड्याळ हातात घालतांना आपण कधी विचार केला आहे का, की आपण घड्याळ नेहमी डाव्या हाताच्या मनगटावर का बांधतो. जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर नक्कीच देऊ.
जुन्या काळात घड्याळ हे हातात नसून खिशात ठेवलेले असायचे. तुम्ही जुन्या काळातील साखळीवाले घड्याळे देखील पाहिली असतील जे खिश्यात ठेवलेली असायची. खिशातून ते घड्याळ काढून वेळ बघितला जात असे. असा म्हंटले जाते की काहींनी ते चैन वाले घड्याळ हातात घालण्यास सुरुवात केली आणि तिथूनच घड्याळ हातात घालण्याचा ट्रेंड सुरू झाला.
डाव्या हातात घड्याळ बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे बहुतेक लोक कामे हे उजव्या हाताने करतात.
जेव्हा आपला उजवा हात कामात व्यस्त असतो, तेव्हा डाव्या हातावर असणाऱ्या घड्याळात वेळ पाहणे खूप सोपे असते आणि उजव्या हाताने कार्य देखील चालू राहते. म्हणूनच आपण पाहिले असेल की परीक्षा चालू असताना विद्यार्थी उजव्या हाताने पेपर लिहित असतात आणि डाव्या हाताने वेळ वारंवार पाहत असतात.
डाव्या हातात घड्याळ बांधणे इतके कॉमन झाले आहे की त्यानुसार आता घड्याळे देखील बनविले जात आहेत. उजव्या हाताने आपण सर्व काम करतो म्हणून डाव्या हातात असणारे घड्याळ देखील सुरक्षित राहते. तसेच घाण होणे, ओरखडे पडणे आणि काम करत असणाऱ्या एखाद्या टेबलाला त्याची धडक होण्याची शक्यता देखील कमी होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.