दररोज पायी चालल्यास आपल्याला जडणार नाही कुठलाही आजार… हे आहेत महत्वपूर्ण फायदे..

दररोज पायी चालल्यास आपल्याला जडणार नाही कुठलाही आजार… हे आहेत महत्वपूर्ण फायदे..

सध्याच्या जमान्यामध्ये अनेकांना बैठे काम मिळत आहे. यामुळे अनेकांना वेगवेगळे आजार जडत आहेत. पूर्वी लोक सायकल वापरायचे किंवा गावात पाईप फिरायचे. मात्र, आता मोठ्या गाड्या आल्यामुळे लोक त्याचाच वापर करतात. अगदी घराजवळ जायचे असले तरी गाडी काढूनच जाण्याला प्राधान्य असते. त्यामुळे शरीराचा व्यायाम हा अजिबात होत नाही.

नाहीतर पायी चालल्याने त्याचे खूप आरोग्यदायी फायदे होतात. तरीदेखील आजकालच्या तरुणांमध्ये बऱ्याच प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे लोक व्यायामाकडे वळताहेत. पायी चालण्याचे फायदे हे खूप मोठ्या प्रमाणात असतात. अनेक आजारावर आपण पाणी चालू न मात करू शकता.

1) शरीर सुदृढ : जर आपण नियमितपणे तीस मिनिटे चालत असाल तर आपले शरीर हे अतिशय सुदृढ राहते. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे जरूर तीस मिनिटे हे चालले पाहिजे. यामुळे आपल्याला खूप फायदे होतील.

2) ऑक्सिजन : अनेक लोकांना ऑक्सिजनची समस्या फार मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांनी दररोज तीन किलोमीटर चालले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे वाढते आणि आपल्याला कुठल्याही आजाराचा सामना करावा लागू शकणार नाही.

3) हाडे मजबूत : आपण दररोज चालण्याचा व्यायाम केला तरी आपले हाडे मजबूत होतात. सहाजिकच आपण फिरल्यामुळे आपल्याला ऊन लागते लागते आणि आपल्या डी जीवनसत्व मिळते. यामुळे आपली हाडे हे मजबूत होतात.

4) थकवा दूर : जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर आपण दररोज अर्धा तास फिरले पाहिजे. त्यामुळे आपल्याला नवा उत्साह प्राप्त होतो आणि आपला थकवा दूर होतो.

5) मानसिक तणाव : जर आपल्याला मानसिक तणावाची समस्या असेल तर आपण नियमितपणे अर्धा तास फिरले पाहिजे. यामुळे आपल्या मानसिक तणाव हा काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होते. चालण्याचा व्यायाम नियमितपणे केल्याच पाहिजे.

6) झोप : झोप जर आपल्याला चांगल्याप्रकारे झोप लागत नसेल आपण नियमितपणे चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे आपल्या शरीराला चांगली ऊर्जा प्राप्त होते आणि रात्रीची झोप देखील खूप चांगल्या प्रमाणात येते.इतर आजाराचा सामना यामुळे करावा लागू शकत नाही.

7) एकाग्रता : जर आपले मन कुठेही लागत नसेल तर आपण चालण्याचा व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. दररोज 30 मिनिटे चालले पाहिजे. यामुळे आपले मन एकाग्र राहील. आपली आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही.

८) रक्तदाब : ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या अशा लोकांनी नियमितपणे चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बीपी समस्या उद्भवणार नाही आणि आपले वजन नियंत्रणात राहिल.

दररोज फिरण्याचे अनेक फायदे आहेत. आपण नियमितपणे चालत राहावे आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे.

Aniket Ghate