तुम्ही कधी विचार केलाय का रेल्वेच्या काही कोचमधील ‘ही’ खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण….

तुम्ही कधी विचार केलाय का रेल्वेच्या काही कोचमधील ‘ही’ खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण….

तुम्हाला माहिती आहे भारतातील रेल्वे सेवा ही आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी असलेली रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. आणि 13000 रेल्वे या लाखो लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी चालवल्या जातात.

तुम्हीही बऱ्याच वेळा रेल्वेने प्रवास केला असेलच. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की, दरवाज्याच्या एकाबाजूला असलेली खिडकी बाकीच्या खिडक्यांपेक्षा जराशी वेगळी का असते? चला तर मंग जाणून घेऊया या वेगळ्या खिडकी मागचे कारण..

रेल्वेला हे वेगवेगळ्या प्रकारचे डबे जोडलेले असतात. रेल्वेच्या AC वाल्या डब्यांना काचा या लावलेल्या असतात तर दुसरीकडे स्लीपर आणि जनरल कोचमध्ये खिडक्यांना रॉड हे लावलेले असतात. परंतु, दरवाज्या बाजूला म्हणजे दरवाज्याच्या जवळच्या खिडकीला बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड हे लावलेले असतात.

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनी कधी याचा विचार देखील केला नसेल. पण यामागचं कारण तुम्हाला नक्कीच माहीत नसणार.

दरवाज्या जवळच्या या वेगळ्या दिसणाऱ्या खिडकीमधून चोरी होण्याची शक्यता ही जास्त असते. बऱ्याचदा चोर या खिडकीतून चोरी करताना दिसलेले होते. दरवाज्यात उभं राहुन या खिडकीपर्यंत सहज हात पोहोतो आणि खिडकीतून सहज काही काढता येऊ शकतं.

रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवाशी झोपलेले असतात, तेव्हा चोर या खिडक्यांमधून सहजपणे सामान चोरी करत होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या खिडक्यांनी सामान्यापेक्षा अधिक रॉड लावण्यात येऊ लागले. जास्त रॉडमुळे यातील गॅप इतका कमी झाला की, त्यातून हात जाणे अवघड होते.

त्यासोबतच दरवाज्यावरील खिडकीला सुद्धा सामान्यापेक्षा अधिक रॉड लावलेले असतात. जेणेकरून रात्री रेल्वे मधेच कुठे थांबली तर चोरांना त्यातून हात टाकून दरवाजा उघडता येऊ नये.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate