कोरोना लस आणि त्यानंतर घ्यावयाची काळजी!!!नक्की जाणून घ्या!!!

कोरोना लस आणि त्यानंतर घ्यावयाची काळजी!!!नक्की जाणून घ्या!!!

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात येतेय.

पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. तुमच्या मनातील महत्त्वाच्या 6 प्रश्नांची उत्तरं

उदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी…या समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जाणून घेऊया लस घेताना घ्यायची काळजी.

कोरोना लसीकरण आणि गैरसमजुती
जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहिमा सुरू झाल्यात. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यात लस तयार झालीय.

मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा या शंका आहेत. मग ‘रोग नको, उपचार आवर’ म्हणण्याची वेळ लोकांवर येईल अशी भीती लोकांना वाटते. म्हणूनच लसीकरणाबरोबरच आवश्यक आहे लोकांचं समुपदेशन..

कोरोना लशीमुळे नपुंसकत्व येतं का?
कोरोना लशीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशी एक समजूत फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. त्याला उत्तर देताना, हर्षवर्धन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,

‘कोव्हिड 19च्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड 19 रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.’

कोविशिल्ड लशीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारण पणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो.

लसीकरणाच्या वेळी घ्यायची काळजी
या व्यतिरिक्त, लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये यावरही आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला ते पाठवण्यात आलंय. त्यातलेही मुद्दे बघूया.

18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल.
दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी.

पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रीऐक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.

गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेनं लस घेऊ नये. लशीच्या चाचण्या गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या अशा महिलांवर कसा परिणाम करतात हे माहीत नाही. म्हणून हा निर्णय झालाय.

ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेतायत अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.

कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारी वेबसाईट्सवर बरीच माहिती आतापर्यंत आलेली आहे.

आरोग्यविभागाची वेबसाईट, पीआयबी वेबसाईट. अशा अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. मिळालेली माहिती पारखून घ्या.

Editor