‘या’ मोठ्या 3 चुकांमुळे घरात पैसा टिकत नाही, घरातील लक्ष्मीमाता घराबाहेर जाते

‘या’ मोठ्या 3 चुकांमुळे घरात पैसा टिकत नाही, घरातील लक्ष्मीमाता घराबाहेर जाते

प्रत्येकाला चांगल्या सुख-सुविधा आणि पैसा हवा आहे. परंतु काही कारणास्तव परिस्थिती अशी बनते की पैशाबाबत व्यक्ती खुपच चिंतेत पडतो, सर्व प्रयत्न करूनही आर्थिक अडचणी दूर होत नाहीत, घरात आर्थिक तंगी निर्माण होते. पैसे येण्याऐवजी, खर्चच वाढतो.

बर्‍याच वेळा आपण घरातील वास्तू दोषाकडे लक्ष देत नाही ज्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येऊ लागतात. वास्तुचे काही उपाय केल्यास तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते, पैशासंबंधी समस्यासाठी काय केले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया

वास्तुशास्त्रानुसार पैसे ठेवण्यासाठी योग्य जागा असणे फार महत्वाचे आहे. आपली तिजोरी किंवा पैशाचे कपाट चुकीच्या दिशेने उघडत असेल तर घरात पैसा टिकत नाही. म्हणून, पैसे ठेवण्याचे कपाट अशा प्रकारे ठेवले पाहिजे की त्याचे मुख उत्तरेच्या दिशेला उघडेल. वास्तुमध्ये कुबेरची दिशा उत्तर मानली जाते. यामुळे व्यर्थ खर्च कमी होतो, आणि संपत्ती जमा होते.

ज्या लोकांच्या घरात पाणी नेहमीच वाहते किंवा नळातून ठिबकत राहते आशा घरात पैसा टिकत नाह. असे म्हणतात की पैसे देखील पाण्यासारखे वाहतात. तर घराचे नळ नेहमीच बंद केले जावे. जर काही बिघाडामुळे आपला नळ टिपकत असेल तर तो त्वरित दुरुस्त करावा.

तुटलेला आरसा, काच किंवा टाकाऊ सामान घरात ठेवल्यास घरात नकारात्मकताही वाढते, ज्यामुळे आपल्याला बर्‍याच समस्या उद्भवू शकतात, म्हणून आपण घरात तुटलेली, फुटलेली वस्तू ठेवू नये. आपल्या घराच्या छतावर कचरा कधीही गोळा होऊ देऊ नका. यामुळे पैशाच्या संबंधित समस्या उद्भवतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate