आणि फायनली करीनाने छोट्या नवाबासोबत फोटो केला शेअर!!!!

आणि फायनली करीनाने छोट्या नवाबासोबत फोटो  केला शेअर!!!!

करीना कपूर खान दुस-यांदा बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर सक्रीय झाली. तिचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांच्याचे लक्ष वेधून घेतले. आता पुन्हा एकदा चिमुकल्यासह तिचा नवीन फोटो समोर आला आहे.

बाळाच्या जन्मानंतर सारेच आतुरेने छोटे नवाबची झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. मात्र चाहत्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. सध्या करिना तैमूर आणि बाळासह निवांत क्षण एन्जॉय करत आहे. दरम्यान तिचा हा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती.

पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाला जगापासून लपवून ठेवले आहे. पण ही प्रतीक्षा लवकरच संपेल, असे मानले जात आहे.फोटोत दिसणारा चिमुकला हा छोटे नवाब म्हणजेच तैमूरचा छोटा भाऊ तर नाही ना ?

असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अनेकांनी हा तैमूरचा भाऊच असल्याचे वाटत आहे. फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे.

त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुसºया मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात. रिपोर्टनुसार, दुसºया मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करेल.

Aniket Ghate