गाड्यांच्या नंबर प्लेटचे रंग वेगवेगळे का असतात ? त्यांचा अर्थ काय असतो…

गाड्यांच्या नंबर प्लेटचे रंग वेगवेगळे का असतात ? त्यांचा अर्थ काय असतो…

भारतीय गाड्यांचे नंबर प्लेट्स या 5-6 रंगाचे आहेत. ज्यात काळा, पांढरा,लाल,आकाशी (निळसर) ,पिवळा, हिरवा अश्या रंगांचा समावेश होतो.

लाल रंग – लाल रंगाचा वापर राष्ट्रपती व वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी केला जातो.अशा गाड्यांमध्ये लायसेन्स नंबर च्या जागी भारतीय चिन्ह असते.पंतप्रधान यांच्या गाडीचा नंबर सामान्य गाडी प्रमाणे असतो.

निळा रंग – हा रंग परदेशी प्रतिनिधी/राजदूत (Ambassador) यांच्या वाहनास दिला जातो.निळ्या रंगावर पांढरा रंगामध्ये नंबर लिहिलेला असतो.आणि त्यावर प्रत्येक देशाचा कोड दिलेला असतो..

पांढरा रंग – हा रंग सामान्य नागरिक वापरत असलेल्या वाहनास दिला जातो.पांढरा रंगावर काळ्या अक्षरांमध्ये नंबर लिहिलेला असतो.

हिरवा रंग – हिरवा रंग हा इलेक्ट्रॉनिक बाईक व चारचाकी यांसाठी वापरला जातो.

पिवळा रंग – हा रंग प्रामुख्याने व्यावसायिक वाहनांना दिलं जातो..जसे ट्रक,टॅक्सी,बसेस…

काळा रंग – ब्लॅक नंबर प्लेट्स भाड्याने किंवा स्वत: चा चालक म्हणून नोंदणीकृत वाहनासाठी असतात. या प्रकारच्या नंबर प्लेट्स लक्झरी हॉटेल वाहतुकीसह देखील लोकप्रिय आहेत. या ड्रायव्हर्सना व्यावसायिक ड्रायव्हिंग परमिट नसल्यास या कार व्यावसायिक वाहन म्हणून चालू शकतात.

Ritesh Bhairat