1 महिना नाही झाला आई होऊन, लगेचच भारतीने दिली ‘खुशखबर’, म्हणाली माझ्या नवऱ्याला कंट्रोलच…

1 महिना नाही झाला आई होऊन, लगेचच भारतीने दिली ‘खुशखबर’, म्हणाली माझ्या नवऱ्याला कंट्रोलच…

भारती सिंग ही भारतातील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक आहे. छोट्या शहरातून आलेल्या भारतीने आज कॉमेडीच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीने 3 डिसेंबर 2017 रोजी लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले.

मात्र, लग्नापूर्वी त्यांच्या अफेअरची बातमी कोणालाच माहिती नव्हती. पण आजच्या काळात भारती आणि हर्ष हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि क्यूट कपल आहेत. जेव्हा दोघे एकत्र असतात तेव्हा लोक आपले हसू रोखू शकत नाहीत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना आई-वडील होऊन फक्त एक महिना झाला आहे.

दोघेही आपल्या गोंडस मुलासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, भारती पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे. खुद्द भारतीनेच याचा खुलासा केला आहे. या नव्या गुडन्यूजसाठी ती एकटीच जबाबदार नसून तिचा नवरा हर्ष लिंबाचियाही याला जबाबदार असल्याचे भारती म्हणते.

भारती सिंहने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुड न्यूजबद्दल बोलताना दिसत आहे. सुरुवातीला ती खूप लाजत आहे, पण नंतर ती तिच्या चाहत्यांना चांगली बातमी सांगते.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की भारती पहिल्यांदा तिच्या ‘खत्रा खत्रा’ शोबद्दल बोलत आहे. मग ती म्हणते, ‘तुम्हा लोकांसाठी चांगली बातमी आहे, पण मी कसं सांगू? मला खूप लाज वाटते. तुम्ही लोक म्हणाल की आता तर तुम्ही एक चांगली बातमी दिलीत आणि मग परत चांगली बातमी देत आहात.

ती पुढे म्हणते, ‘काय करू मित्रांनो, ही गोष्ट आपल्या हातात नाही. जाऊद्या होऊन गेला. याला मी एकटी जबाबदार नाहीये याबाबत मी शूटिंगच्या वेळी सांगेन. यात हर्षचाही मोठा हात असून आम्हा दोघांचीही मेहनत आहे. त्यामुळे मी सेटवर जाऊन चांगली बातमी काय आहे ते सांगेन’.

यानंतर आनंदाची बातमी सांगताना भारती लाजायला लागते, म्हणून हर्ष म्हणतो लाजते काय? जे होऊन गेल ते गेलं. मग भारती सर्वांना आनंदाची बातमी देते आणि सांगते की तिला YouTube वरून सिल्वर आणि गोल्ड बटण मिळाली आहेत. वास्तविक, भारतीचे स्वतःचे एलओएल नावाचे यूट्यूब चॅनल आहे, म्हणजेच ‘लाइफ ऑफ लिंबाचिया’. या चॅनलद्वारे भारती चाहत्यांना तिच्या आयुष्याविषयी अपडेट देत असते, अशी माहिती आहे.

काही दिवसांचा ब्रेक घेऊन भारती सिंह कामावर परतली आहे. सध्या भारती आणि हर्ष ‘खत्रा खत्रा# या शोमध्ये दिसत आहेत. दोघेही शो होस्ट करत आहेत. यापूर्वी दोघे ‘हुनरबाज’ शोमध्ये होस्ट म्हणून दिसले होते. दरम्यान, मुलाचा चेहरा अद्याप समोर आला नसल्याने चाहते त्यांच्या मुलाचा फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट करून भारतीला त्यांच्या मुलाचा फोटो दाखवण्याची विनंती केली आहे.

Aniket Ghate