‘वास्तुशास्त्रा’ नुसार बेडरूममध्ये कधीच ‘या’ वस्तू नसाव्यात, नाहीतर पती-पत्नी होतो ‘कलह’

‘वास्तुशास्त्रा’ नुसार बेडरूममध्ये कधीच ‘या’ वस्तू नसाव्यात, नाहीतर पती-पत्नी होतो ‘कलह’

जर वास्तुमध्ये दोष असेल तर घरात काहींन काही समस्या ह्या कायम असतात. म्हणून घराची वास्तु बरोबर असणे खूप महत्वाचे आहे. घरात कोणतीही वस्तू बांधत असतांना ती कोणत्या दिशेने बांधली जावे हे आवश्यक आहेच, परंतु घरात सजावट करताना कोणती वस्तू कोठे आणि कशी ठेवली जावी हे देखील आवश्यक आहे.

चुकीच्या जागेवर ठेवलेली वस्तू देखील वास्तूमध्ये दोष निर्माणसाठी कारणीभूत ठरते. ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, घराच्या खोल्यांमध्ये रंगांचा वापर आणि कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.

घरात बेडरूम हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या खोलीचे वास्तू बरोबर असले पाहिजे, अन्यथा विवाहित जीवन आणि त्या खोलीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनात समस्या सुरू होतात. बेडरूममध्ये वास्तुनुसार कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ते आपण जाणून घेऊया

शयनगृहातील वास्तुनुसार (झोपण्याच्या खोलीत) काही गोष्टी बेडरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. झाडू, चिमटा, डबे, कढई, तीक्ष्ण वस्तू आणि डस्टबिन इत्यादी वस्तू बेडरूममध्ये ठेवू नयेत. यामुळे वस्तू खोलीत ठेवल्याने बेडरूम मधल्यांच्या जीवनात त्रास सुरू होतो. जर विवाहित व्यक्ती त्या खोलीत राहिली तर त्याच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण होतात.

जर आपल्या विवाहित जीवनात मतभेद होत असतील तर विसरून ही आपल्या बेडरूममध्ये तीक्ष्ण शोपीस ठेवु नका. सजावटीसाठी काटेरी झाडे कधीही बेडरूममध्ये लावू नयेत. यामुळे विवाहित जीवनात विचित्रपणा वाढतो. आपल्या खोलीत अशी एखादी वस्तू असल्यास ती त्वरित काढून टाकली पाहिजे.

वास्तुनुसार खराब इलेक्ट्रॉनिक गोष्टी घरात नकारात्मकता आणतात. म्हणूनच घराच्या कोणत्याही खोलीत किंवा शयनकक्षातील कोणतेही उपकरण, पंखे, एसी वगैरे खराब झाल्यास ती त्वरित दुरुस्त करावी. त्याचप्रमाणे तुटलेल्या वस्तू देखील नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. म्हणून, तुटलेल्या फोटो फ्रेम्स इत्यादी बेडरूममध्ये ठेवू नयेत.

काही लोक बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र किंवा त्याला शोपीस ठेवतात, परंतु ताजमहालचे चित्र किंवा त्याला शोपीस म्हणून कधीही ठेवू नये. हे वास्तुमध्ये अशुभ मानले जाते. त्यामुळे पती-पत्नीने मध्ये भांडण होतात किंवा रागाराग होते त्यामुळे कधीही खोल्यांमध्ये अशी दृश्यांची छायाचित्रे लावू नये. यामुळे विवाहित जीवनात अंतर निर्माण होते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate