भारतीय पोरी सोडून ‘या’ विदेशी पोरीसोबत मजा मारतोय अर्जुन तेंडुलकर, पोरगी पाहून तुम्ही म्हणाल काय….

भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्ये देखील त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण प्रत्येक सामन्यापूर्वी त्याच्या खेळण्याबद्दल लोक नक्कीच अंदाज लावत असे.
अर्जुनला मुंबईने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये स्थान दिले नव्हते. सध्या तो इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तिकडे अर्जुन इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल यटसोबत लंच डेटवर गेला होता. डॅनियल यटने 2014 मध्ये विराट कोहलीला ट्विटरवर ट्विट करत प्रपोज केले होते. त्यावेळी सोशल मीडियावर खळबळ पसरली होती.
इंग्लंडच्या महिला संघातील ही महत्त्वाची सदस्य अर्जुनची चांगली मैत्रीण आहे. दोघे लंडनमध्ये एकत्र फिरत आहेत. डॅनियल याट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनचा फोटो टाकला आहे. हा डावखुरा वेगवान गोलंदाज रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेत आहे.
याटची ही इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याट आणि अर्जुन खूप दिवसांपासून मित्र आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करत राहतात. याट अर्जुनच्या गोलंदाजीची चाहती आहे. 2020 मध्ये तिने सांगितले होते की अर्जुनची गोलंदाजी सतत सुधारत आहे आणि आता त्याच्या चेंडू वर खेळणे कठीण जात आहे.
अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते. त्याला मुंबईने गेल्या वर्षीच विकत घेतले होते. अर्जुनला त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 20 लाख रुपये जास्त मिळाले आहेत. यावेळी मुंबईने त्याला 30 लाख रुपयांना खरेदी केले. मागच्या वेळी त्याला अर्जुनसाठी 20 लाख रुपये खर्च करावे लागले होते. मात्र, आतापर्यंत त्याला मुंबईसाठी पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
