पुण्याच्या मेट्रोत अमृता खानविलकर ने धरला लावणीचा ठेका, पहा विडिओ

पुण्याच्या मेट्रोत अमृता खानविलकर ने धरला लावणीचा ठेका, पहा विडिओ

अमृता खानविलकरची भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे याची देखील भूमिका आहे‌. अमृता खानविलकर ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटाकडून सर्वांना खूप अशा अपेक्षा आहेत. अमृता खानविलकर ही आपल्याला अनेक दिवसानंतर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी नटरंग या चित्रपटात तिने वाजले की बारा या गाण्यावर धमाल नृत्य करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.

त्यानंतर अमृता खानविलकर हिने काही चित्रपटात काम केले. मात्र, तिला त्यामुळे जेमतेम यश मिळाले. तिने काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील काम केल्याचे सांगण्यात येते. आगामी काळामध्ये तिच्याकडे आणखी काही चित्रपट असल्याचे देखील ही सांगण्यात येते. त्यामुळे ती लवकरच हिंदी चित्रपटामध्येही दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमृता खानविलकर हिने काही वर्षापूर्वी हिंदी मधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेता हिमांशु मल्होत्रा यांच्या सोबत लग्न केले आहे. हिमांशू हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. अमृता आणि हिमांशू यांनी नच बलिये या टिव्ही शो मधून आपल्या जबरदस्त आशा डान्सने सगळ्यांनाच घायाळ केले होते.

हे दोघे सध्या वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, यात काहीही तथ्य नाही. दोघेही कामानिमित्त वेगवेगळे राहत असल्याचे अमृता हिने स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुणे मेट्रोमध्ये येणाऱ्यांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्याचप्रमाणे या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात लागली आहे. मेट्रो कशी असते हे पाहण्यासाठी देखील अनेक जण उत्सुक झाले आहेत. आता याचाच फायदा घेत अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील तिच्या चंद्रमुखी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क मेट्रो मध्येच डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रा या गाण्यावर तिने अतिशय धमाल असे नृत्य केले आहे.

या गाण्यावर तिच्यासोबत उपस्थित प्रवाशांनी देखील जबरदस्त ठेका धरून तिची साथ दिली आहे, तर अमृता खानविलकर हिचा कुठला चित्रपट आपल्याला सर्वाधिक आवडतो आम्हाला नक्की सांगा.

Aniket Ghate