विमानातून प्रवास करत असताना एरोप्लेन मोड ऑन न केल्यास काय होईल?

विमानातून प्रवास करत असताना एरोप्लेन मोड ऑन न केल्यास काय होईल?

विमान उद्योग हा सुरक्षिततेच्या बाबतीत अति जागरूक आहे. धोक्याची शंका जरी आली तरी संबंधित विमान कंपनी आणि नियंत्रक (regulators) त्या बाबींचा अभ्यास करून काय उपाय-योजना करायची त्यावर निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणीही करतात.

जेव्हा आपला मोबाईल फोन चालू असतो तेव्हा तो सतत जवळच्या टॉवरच्या संपर्कात असतो. ह्या लहरी विमानाच्या संदेशवहनात अडथळा आणू शकतात. शिवाय विमानाच्या कॉकपिट मधील उपकरणातील रीडिंग चुकीचे दाखवले गेल्याची उदाहरणे आहेत.

पण ही झाली सुरवातीच्या काळातील गोष्ट. आता विमान उत्पादकांनी विमानात वापरल्या जाणाऱ्या उपकरणात आणि avionics मध्ये आमुलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे नवीन विमानात तुमच्या मोबाईलमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे.

अनेक विमान कंपन्या आपल्या विमानातून आता तुम्हाला फोन चालू ठेऊ देतात. त्यांची वायफाय सेवा वापरून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीशी बोलूही शकता. म्हणजे थोडक्यात मोबाईलमुळे विमानाला धोका नाही (निदान नवीन विमानांना तरी) असं समजायला हरकत नाही. आपल्या विमानात मोबाईल वापरू द्यावे की नाही त्याचा निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य नियंत्रकांनी विमान कंपन्यांना दिले आहे.

तरीही ह्या विमान कंपन्या विमानाच्या टेक-ऑफ आणि लॅन्डीन्गच्या वेळी मोबाईल चालू न ठेवण्याच्या सूचना देतात. ह्या वेळी वैमानिक आणि विमानतळाच्या कंट्रोल टॉवर मध्ये होणाऱ्या संभाषणाची पातळी जास्त असते. त्यामध्ये व्यत्त्यय येऊ नये म्हणून या सूचना असतात.

थोडक्यात प्रत्येक विमान उड्डाणाच्या वेळी मोबाईलच्या बाबतीत विमानातील कर्मचारी जी सूचना करतील त्याचं पालन करावं. तेथे जास्त फुशारकीपणा करू नयेत. तुम्हाला (तुमच्या मोबाईलसकट) बाहेर काढण्याचे अधिकार त्यांना आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate