विमानातील ‘हवाईसुंद-या’ प्रवाशांना खाणं देण्याव्यतिरिक्त विमान प्रवासात कोणकोणती कामं करतात?

विमानातील ‘हवाईसुंद-या’ प्रवाशांना खाणं देण्याव्यतिरिक्त विमान प्रवासात कोणकोणती कामं करतात?

भरपूर पगार आणि परदेशात फिरण्याची संधी म्हणून हवाई सुंदरीच्या करिअरकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येकालाच या करिअरविषयी खूप आकर्षण वाटत आलेय. करिअरच्या विविध बारकाव्यांविषयी जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे.

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुखसोयी, समाधान आणि सामान्य गरजेकडे बारकाईने लक्ष देणे, विमानाची आतील स्वच्छता राखणे, प्रवाशांचे दरवाजात उभे राहून हसतमुखाने स्वागत करणे, प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेपर्यंत नेऊन सोडणे, विमान उड्डाणापूर्वी आणि नंतर प्रवाशांना त्यांचे सीट बेल्ट बांधण्यास मदत करणे, वाचनाचे साहित्य, पाणी, खानपान इत्यादी वस्तू पुरवणे.

प्रवाशांना प्रवासमार्गाची तसेच त्यांना इतर चौकशीची माहिती पुरवणे, उड्डाणाच्या दरम्यान येणारी प्रमुख स्थळे दाखवून त्याबद्दल माहिती पुरवणे, अडचणीतील प्रवाशांना मदत करून त्यांची अडचण दूर करणे, थंड किंवा इतर पेये पुरवणे, किरकोळ आजारावर औषध पुरवणे, विमानात येणाऱ्या धोक्याच्या वेळी प्रवाशांना धीर देणे.

विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना पुन्हा हास्यवदनाने नमस्कार करून त्यांचा निरोप घेणे याशिवाय इतर लिपिकीय काम करणे, हवेचा दाब कमी होताच त्यासाठीच्या मास्कचा उपयोग कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे अशी लहानसहान कामे हवाई सुंदरीला करावी लागतात.

हवाई सुंदरीसाठी विमान कंपन्या अनेक सोयी उपलब्ध करून देतात. त्यांना त्यांच्या घरापासून विमानतळावर घेऊन जाणे आणि परत सोडणे, अन्य ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय करून देणे, त्यांना लागणारे गणवेश आणि इतर वस्तू पुरवणे, या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असतो.

हवाई सुंदरीचे खरे कसब आपत्कालीन परिस्थितीत लागते आणि तो त्यांचा कामाचा ८० टक्के भाग आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलेले असते आणि दरवर्षी त्यांना त्याचा रेफ्रेशेर कोर्स करावा लागतो. त्यात अनेक भाग असतात. एका प्रशिक्षणात देखील जर तुम्ही चुकले तर तुमची हवाई सेवा काढून घेतली जाते आणि तुम्हाला ग्राउंड स्टाफ ची सेवा करावी लागते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate