लग्नाच्या 2 महिन्यातच आलियाने दिली ‘गुडन्यूज’, दवाखान्यात स्पॉट झाले रणबीर आणि आलिया

लग्नाच्या 2 महिन्यातच आलियाने दिली ‘गुडन्यूज’, दवाखान्यात स्पॉट झाले रणबीर आणि आलिया

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट हिच्याकडे आघाडीची अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. आलिया भट ही महेश भट्ट यांची मुलगी आहे. महेश यांना सोनी राजदान यांच्यापासून आलिया आणि शाहीन या मुली आहेत. तर महेश यांच्या पहिल्या मुलीचे नाव पूजा भट्ट असे आहे. पूजा भट्टने एकेकाळी बॉलिवूड गाजवून सोडले होते.

आपल्या किसिंग सीन ने तिने सर्वांनाच चकित करून सोडले होते. मात्र, आता पुजा निर्मात्याच्या भूमिकेत गेलेली आहे. ती अनेक चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. पूजा भट्ट कडे सध्या अनेक चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते. आता आलिया भट हीचा जमाना असून आलिया अनेक चित्रपटांमध्ये दिसत आहे.

आलिया हिने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट गाजला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट तिने केलेले आहेत. सध्या देखील तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे अनेक चित्रपटाचे चित्रीकरण हे रखडले आहे.

त्यामुळे सध्या ती आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालत आहे, असे असले तरी सध्या ती रणबीर कपूर याच्या सोबत राहते. रणबीर कपूर याच्यासोबत तिचे प्रेम प्रकरण गेल्या काही वर्षापासून सुरू होते. रणबीर कपूर याचे कटरीना कैफ सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र, कालांतराने दोघांमध्येही हे संबंध संपुष्टात आले. त्यानंतर आलिया आणि रणबीर कपूर यांचे सूत जुळले.

याच वर्षी एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूर यांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. मुंबईच्या आर. के स्टुडिओमध्ये या दोघांचे लग्न झाले. या दोघांच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यांचे लग्न अतिशय चर्चेचा विषय बनले होते. कारण हे दोघेही अनेक वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या घरी जात येत होते.

एवढेच नाही तर गेल्या काही वर्षापासून रणबीर आणि आलिया एकत्रच राहत होते. त्यामुळे हे दोघं कधी लग्न करणार याच्या चर्चादेखील रंगल्या. आता या दोघांनी लग्न केले आहे. लग्नानंतर हनिमूनला कधी जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हनिमूनला जाता येत नाही, असे त्यांनी म्हटले होते, तर आता आलिया भट हिने नुकतीच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर तिने आपला रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर झोपलेली दिसत आहे, तर कम्प्युटरच्या डिस्प्लेवर हार्ट ईमोजी दाखवण्यात आली आहे. आलिया हिने म्हटले की, मी लवकरच आई होणार आहे. आमच्या घरी लवकरच पाहुणे येणार आहेत.

त्यानंतर रणबीर कपूर याची बहीण रीदिमा कपूर हिने देखील या दोघांना शुभेच्छा देऊन आम्ही देखील या गोंडस बाळाची वाट पाहत आहोत, असे म्हटले आहे. अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sayali Ghate