लग्नाला थोडेच दिवस झाले आणि आलियाच्या डोळ्यात आले पाणी, कारण रणबीर ने तिला मार…

लग्नाला थोडेच दिवस झाले आणि आलियाच्या डोळ्यात आले पाणी, कारण रणबीर ने तिला मार…

बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच त्यांचे लग्न झाले. दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉपचे अभिनेते व अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

आताही या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही चाहत्यांच्या ओठावरून उतरल्या नव्हत्या तोच आलिया भट्टचा रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रणबीर आणि आलियामध्ये खूप प्रेम आहे, तरीही आलिया भट्ट रणबीर कपूरला धरून का रडतेय? या दोघांच्या लग्नाला केवळ दीड महिना झाला आहे.

मग असे काय झाले की सासरच्या घरी गेल्यावर आलिया भट्टला रणबीर कपूरला धरून रडावे लागले. आजच्या लेखात हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहुया. नुकताच आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती पती रणबीर कपूरला धरून रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरही खूप उदास दिसत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. खरंतर हा व्हिडिओ रणबीर आणि आलियाच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. तोच व्हिडीओ आलिया भट्टने शेअर केला आहे. रणबीर आणि आलियाची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे इतर दिग्गज कलाकारही दिसत आहेत.

त्यामुळे चाहते या चित्रपटाबाबत कमालीचे उतावीळ असल्याचे दिसत आहे. अलीकडेच Vizag ने आयोजित केलेल्या एका फॅन इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि एस. एस. राजामौली यांनी एक मुलाखती दिल्या आणि त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा टीझर लाँच केला. हा टिझर अयान मुखर्जी आणि चित्रपटातील इतर कलाकारांनी शेअर केला होता.

याशिवाय करण जोहर आणि टीमच्या इतर सदस्यांनीही तो सोशल मीडियावर शेअर केले होता. यासोबतच अयान मुखर्जीने या कार्यक्रमात माहिती दिली की, या चित्रपटाचा ट्रेलर 18 जून रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Sayali Ghate