‘आई कुठे काय करते’ चाहत्यांसाठी दुःखद बातमी; ‘या’फोटोमुळे उडाला गोंधळ,लवकरच मालिका घेणार निरोप, पहा फोटो!!

‘आई कुठे काय करते’ चाहत्यांसाठी दुःखद बातमी; ‘या’फोटोमुळे उडाला गोंधळ,लवकरच मालिका घेणार निरोप, पहा फोटो!!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिवसेंदिवस ही मालिका आता रंजक वळण घेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं चाहत्यांच्या मनावर गारुड घातला आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून या मालिकेत अनेक नवनवीन कलाकारांच्या मालिकेत येण्यान रोज ही मालिका नवीन ट्विस्ट घेवून येत असते. मात्र दरम्यान आता ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.

कारण सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय जो पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. व ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अनिरुद्ध आणि अरुंधती म्हातारे झालेले दाखवण्यात आले आहेत.

ते एकत्र आले आहेत आणि त्यांचा म्हातारपणीही एकमेकांकडे पाहून गोड हसत आहेत. हा फोटो पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिका संपणार का, आता अचानक असा निर्णय कसा घेतला, मालिकेचा शेवट काय असणार, संजना कुठे गेली, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहेत.

मात्र या फोटोनं गोंधळ उडवल्यानंतर अपूर्वा गोरे म्हणजेच ईशा हिच्या एका चाहत्यांने फोटोमागच खरं सत्य सांगितलं आहे. व त्यामुळे गोंधळ दूर झाला आहे. चाहत्याने कमेंट करत सांगितलं की, मालिका संपत नाहीये तर हा फोटो अरुंधती आणि अनिरुद्धच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अरुंधतीने पाहिलेल्या स्वप्नातील आहे.

अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यावर मालिकेत त्यांचं पुन्हा एकदा लग्न झालेलं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळेस अरुंधतीने पाहिलेल्या स्वप्नात तिने हे चित्र पाहिलं होतं. हे पाहताच आता अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Team Hou De Viral