एवढी मोठी चूक ! ‘आई कुठे काय करते’ मधील ती चूक प्रेक्षकांनी पकडली

एवढी मोठी चूक ! ‘आई कुठे काय करते’ मधील ती चूक प्रेक्षकांनी पकडली

स्टार प्रवाह या वाहिनीवर गेल्या दीड ते दोन वर्षापासून आई कुठे काय करते ही मालिका सुरू आहे. आई कुठे काय करते ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती.

मात्र, आता या मालिकेमध्ये अतिशय घाणेरडे प्रकार दाखवण्यात येत आहेत, असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही मालिका आता लवकरच बंद करावी, असा आग्रह देखिला अनेक प्रेक्षक करताना दिसत आहेत. मालिकेमध्ये आधी संजना आणि अनिरुद्ध यांचे अफेअर दाखवण्यात आले.

त्यानंतर आता संजना हिचे देखील प्रेम प्रकरण दाखवण्यात येत असल्याने प्रेक्षक भडकले आहेत. त्याचप्रमाणे अनघा अभी यांचे लग्नही चर्चेचा विषय बनले होते. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेवर अनेक प्रेक्षक नाराज झाल्याचे दिसत आहेत. मात्र आता काही प्रेक्षकांनी आई कुठे काय करते या मालिकेतील एक चूक नजरेस आणून दिलेली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीच्या भूमिकेमध्ये आपल्याला मधुराणी प्रभुलकर गोखले ही दिसली आहे. मधुराणी हिने अनेक मालिका चित्रपटात याआधी काम केलेले आहे. त्यामुळे ती पडद्यावर सहजपणे वावरताना दिसत असते. अनिरुद्धची भूमिका मालिकेत मिलिंद गवळी यांनी साकारली आहे.

मिलिंद गवळी हे देखील अनेक मालिका चित्रपट आपल्याला या आधी दिसले आहेत. तर बोल्ड आणि ब्युटीफुल रुपाली भोसले मालिकेत संजनाच्या भूमिकेत दिसलेली आहे. छोट्या पडद्यावर ती जी भूमिका साकारत आहे, वैयक्तिक आयुष्यात देखील तिच्यासोबत असाच प्रकार घडलेला आहे. तिने एक लग्न करून दुसऱ्याला आता सोडले आहे.

मिलिंद शिंदे यांच्यासोबत संजनाचे पहिले लग्न झाले होते. त्यानंतर ती अनिकेत मगरे याला डेट करत होती. मात्र, आता त्याच्या सोबतही रूपाली हिने ब्रेकअप केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये सध्या अरुंधती हिने देशमुख कुटुंबीयांचा समृद्धी बंगला सोडला आहे. त्यामुळे ती आता नवीन घराच्या शोधात होती.

तर दुसरीकडे कांचन आप्पा यांना म्हणते‌. अरुंधती हिने आता घर सोडले आहे. त्यामुळे आता आपण संजनला सुनेचा दर्जा द्यायला हवा. त्यानंतरच ती आपले सगळे काही करेन, असे म्हणते. यावर आता आप्पा काय निर्णय घेतात, याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे, तर दुसरीकडे सुलेखाताई या अरुंधती हिला सांगते की, आशुतोष सोबत तू आता लग्न करून घे.

त्यामुळे या मालिकेत पुढे काय होणार याची आता उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या मालिकेमध्ये अरुंधती ही आता नवीन घर शोधत होती. तिला नवीन घर मिळाले देखील आहे. मात्र प्रेक्षकांनी ही चूक आता निर्मात्यांच्या लक्षात आणून दिली आहे. कारण अरुंधती ज्या घरात राहत आहे ते घर पूर्वी संजनाचे होते.

फक्त आता घराचे इंटेरियर बदलण्यात आले आहे, असे प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे किमान प्रेक्षकांना तरी उल्लू बनवू नका, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Aniket Ghate