मोबाइल कंपनी अठ्ठावीस दिवसांचे रिचार्ज का करायला सांगतात?

मोबाइल कंपनी अठ्ठावीस दिवसांचे रिचार्ज का करायला सांगतात?

सध्या भारतीय दूरसंचार जगतात अनेक कंपन्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ज्यामध्ये आयडिया, व्होडाफोन, ऐरटेल, BSNL अश्या कंपन्या आहेत.

टेलिकॉम कंपनी जिओ मार्केट मध्ये आल्याने सर्व कंपन्याने आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅनद्वारे जास्तीत जास्त फायदे करून देणारे प्लॅन पुरवित आहेत, परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या महिन्याभराच्या रिचार्जची वैधता २ दिवस का कमी ठेवतात? आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत जे जाणून तुम्हाला मोठा धक्काच बसणार आहे.

२८ दिवसांचा रिचार्ज मागचे कारण, वर्षाचे ३६५ दिवस भागिले २८ दिवस म्हणजे १३ महिने, म्हणजे तुम्हाला १२ ऐवजी १३ रिचार्ज दरवर्षी करावे लागतात, हि कंपनीची जणू एक नालायक स्ट्रॅटेजी आहे असे आपण म्हणू शकतो, जी वापरून मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना सरळ सरळ लुबाडतात.

तसेच तुम्ही जर १ जानेवारीला रात्री १० वाजता रिचार्ज केलात तर फक्त २ तासासाठी तुमचा पूर्ण दिवस गृहीत धरला जातो, तसेच तुमचा रिचार्ज २८ जानेवारी ला संपणार असेल तर २६ जानेवारी पासूनच तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी SMS यायला सुरवात होते.

आणि तुम्ही जर २६ जानेवारी ला रिचार्ज केलात तर तुमचे उरलेले २ दिवस वाया गेले आणि नवीन प्लॅन २६ जानेवारी पासून चालू होईल. आणि जर तुम्ही वेळेत रिचार्ज नाही केलात तर तुमचा शिल्लक बॅलन्स उडविला जातो.

सध्या लोक अनलिमिटेड चा रिचार्ज करतात पण बरेच लोक Dual SIM वापरतात अशावेळी प्रायमरी नंबर ला अनलिमिटेड चा रिचार्ज केला जातो आणि दुसऱ्या नंबर वर फक्त Validity रिचार्ज केला जातो. तर व्हॅलिडिटी रिचार्ज मध्ये तुम्हाला ३५ ते ३८ रुपये टॉक टाईम मिळतो, तो रिचार्ज वेळेवर नाही केला तर हा टॉक टाईम बॅलन्स उडवला जातो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Aniket Ghate