“हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत | Spruha joshi shared her favourite books saying she has crush on them

“हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत | Spruha joshi shared her favourite books saying she has crush on them

छोट्या पडद्यावरील स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमात भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. अभिनय आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या क्रशबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री, कवियित्री, सूत्रसंचालिका असण्याबरोबरच स्पृहा एक लोकप्रिय यूट्यूबरही आहे. ‘स्पृहा जोशी’ हा तिचा स्वतःचा यू ट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या कविता, तिने वाचलेली पुस्तकं यांबद्दल प्रेक्षकांना माहिती देत असते. नुकताच तिने या चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तिने नुकतीच वाचून पूर्ण केलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली आहे. ही पुस्तकं वाचून झाल्यावर ती त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडली आहे.

आणखी वाचा : KBC 14: चित्रपट विनामूल्य पाहता यावा यासाठी अमिताभ बच्चन करायचे ‘हे’ काम; बिग बींनी सांगितलं गुपित

नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील पोस्ट केले. यात तिच्या हातात काही पुस्तकं असल्याचं दिसत आहे. या पुस्तकांना तिने तिचं क्रश म्हटलं आहे. यात ‘कालकल्लोळ’, ‘हमारी याद आएगी’, ‘थालीपीठ’, ‘डियर तुकोबा’, ‘मु.पो.आई’ अशा पुस्तकांचा समावेश आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “माझं माझ्या या पुस्तकांवर खूप क्रश आहे. तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचत आहात? मला कमेंटमध्ये कळवा.”

स्पृहाचं पुस्तकांवर प्रेम असल्याचा तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. चाहते तिच्या या वाचनाच्या आवडीचं खूप कौतुक करत आहेत. तसंच स्पृहाच्या या व्हिडीओला प्रतिसाद देत नेटकरी कोणतं पुस्तक वाचत आहेत हेदेखील तिला सांगत आहेत.

हेही वाचा : अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा, म्हणाली “आम्हाला जबरदस्ती एका…”

दरम्यान स्पृहा काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘सूर नवा ध्यास नवा’ची सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. तर आता ती नव्या भूमिकेत कधी दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. स्पृहा आगामी काळात काही चित्रपटांमध्ये झळकणार असल्याचं तिच्या पोस्ट्समधून कळून येतं. पण अद्याप कोणत्याही चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Aniket Ghate