‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी आवाज का दिलात? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले… | MNS chied raj thackrey says why he gave his voice for marathi film har har mahadev

‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी आवाज का दिलात? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले… | MNS chied raj thackrey says why he gave his voice for marathi film har har mahadev

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला कणखर अशा सह्याद्रीसाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज वापरला आहे आणि तो आपल्याला या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकायला मिळतो. यानिमित्ताने याच चित्रपटाच्या टीमने राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला आहे.

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुबोध भावे यांनी राज याची मुलाखत घेतली. राजकारण तसेच चित्रपट याविषयी सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याचदरम्यान सुबोध यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की “याआधी तुमच्याकडे अशा चित्रपटाला आवाज देण्यासाठी बऱ्याच ऑफर आल्या असतील, तरी तुम्ही ते इतके चित्रपट नाकारून ‘हर हर महादेव’ या चित्रपटालाच का आवाज दिला?”

आणखी वाचा : दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटीवर पाहता येणार?

या प्रश्नावर राज ठाकरे यांनी त्यांच्या व्हॉईस ओव्हर देण्याचा अनुभव त्यांनी शेअर केला. शिवसेनेच्या जाहिरातीच्या कॅम्पेनमध्ये सर्वप्रथम राज यांनी त्यांचा आवाज दिला होता. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच राज ठाकरे यांचा आवाज आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाला आवाज देण्यामागचं कारण राज ठाकरे यांनी सांगितलं की, “अभिजीत यांचं काशीनाथ घाणेकरमधलं दिग्दर्शन पाहिलं होतं आणि मला माहिती आहे की हा कष्ट घेणारा माणूस आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते वेडीवाकडी फिल्म बनवणार नाहीत. मी जो काही आवाज देऊन तो उगाच फुकट जाणार आहे असं मला अभिजीत यांची मेहनत बघून कधीच वाटलं नाही. म्हणून मी या चित्रपटाला व्हॉईस ओव्हर देण्यासाठी तयार झालो.”

याबरोबरच राज ठाकरे यांनी आजवर कधीच कुणी त्यांचा आवाज वापरण्यासाठी आले नसल्याचंही स्पष्ट केलं. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला मराठीसह इतर ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुबोध भावेबरोबरच शरद केळकर,शरद पोंक्षे, अमृता खानविलकर, असे कलाकारही आपल्याला बघायला मिळतील.

Aniket Ghate