‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं?’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं?’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

काही वर्षांपूर्वी आलेला सैराट हा चित्रपट आपण पाहिला असेल. सैराट चित्रपटामध्ये परशा आणि आर्ची ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली होती. विशेष करून आर्चीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने साकारली होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ग्रामीण धाटणीचा चित्रपट बनवायचा होता.

असेही नागराज मंजुळे यांचे ग्रामीण धाटणीचे चित्रपट अधिक आहेत. त्या वेळेस त्यांना ग्रामीण भागातच चेहरा पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी अनेक तरुण अभिनेत्री पाहिल्या. मात्र, त्यांना कोणाचाही चेहरा पसंत पडत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणीची निवड या चित्रपटासाठी केली.

तिची ऑडिशन घेतली. नागराज मंजुळेंना ती मुलगी आवडली. तिचे नाव रिंकू राजगुरु असे होते. सैराट चित्रपट आला होता, त्यावेळेस रिंकू राजगुरुची दहावी देखील झाली नव्हती. चित्रपट झाल्यानंतर तिने दहावीची परीक्षा दिली होती. हा चित्रपट एवढा गाजला की, मराठीमध्ये या चित्रपटाने पहिल्यांदाच शंभर कोटींचा व्यवसाय केला.

त्यामुळे नागराज मंजुळे यांचे नाव बॉलिवूडमध्ये देखील पोहोचले. त्यामुळे सैराट चित्रपटाचा रिमेक देखील बॉलिवूडमध्ये आला. धडक नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दिसले होते. रिंकू राजगुरु या चित्रपटानंतर अतिशय लोकप्रिय झाली.

तिला बाहेर फिरताना बॉडीगार्ड घेऊन फिरायला लागायचे. त्यानंतर तिचे 1 ते 2 चित्रपट आले. मात्र, त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिचे स्टार डम देखील काही प्रमाणात उतरले. आता रिंकू राजगुरु ही अनेक ठिकाणी स्टेज शो किंवा अनेक प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यासाठी जात असते.

यासाठी तिला चांगला पैसा देखील मिळत असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर देखील ती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपले अनेक फोटो आणि आपले विचार मांडत असते. रिंकू राजगुरु ही सगळ्यात शेवटी ‘अनकही कहानिया’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. त्यानंतर दोनशे हल्ला या वेब सिरीज मध्ये देखील ती दिसली होती.

आता नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटामध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर म्हणजे परश्या याची भूमिका देखील असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण अमिताभ बच्चन हे आहेत. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रिंकू राजगुरूने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे.

या फोटोमध्ये ती गुलाबी साडी वर दिसत आहे. त्याचप्रमाणे तिने गजरा देखील मळला आहे. या फोटोखाली तिने कॅप्शन देखील दिली आहे. त्याच्यामध्ये ती म्हणते, लवकरच काहीतरी नवीन दिसेल. त्यावर अनेकांनी कमेंट करून तिला विचारले की, तुझे लग्न ठरले आहे का? तसेच तू खूप सुंदर दिसत आहेस.

अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॉमेंट टाकल्या आहेत. त्यामुळे रिंकू राजगुरु आता काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

Aniket Ghate