सई ताम्हणकरचा बिकिनी लूकमधील फोटो व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाली…

सई ताम्हणकरचा बिकिनी लूकमधील फोटो व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाली…

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. मराठीबरोबरच सईने हिंदी चित्रपटांतूनही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासह सई तिच्या बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते.

अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडत बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी सई एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सईने नुकतंच ‘वुमन फिटनेस’ या मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. या मासिकाच्या कव्हर फोटोवर असलेल्या सईच्या बिकीनीतील फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मासिकाचा फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे.

हेही वाचा >> अमिताभ बच्चन यांच्या नातीला डेट करत असल्याच्या चर्चांवर सिद्धांत चतुर्वेदीने सोडलं मौन, म्हणाला…

“बुम…फिटनेस हा माझ्यासाठी नेहमीच अवघड पण प्रभावी असा प्रवास राहिलेला आहे. माझ्यामते चिकाटी आणि सातत्य हे प्रत्येक गोष्टीतील महत्त्वाचे भाग आहेत. मी अजूनही या दोनही गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे. ‘वुमन फिटनेस’च्या कव्हर पेजवर फोटो झळकल्यामुळे कायम शारीरिक सुदृढता जपण्याची ताकद मला मिळाली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत”, असं म्हणत सईने आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं आहे.

हेही वाचा >> “…म्हणून स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका”, अक्षय कुमारने सांगितलं राज ठाकरे कनेक्शन

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

हेही वाचा >> सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई? लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याच्या चर्चांना उधाण

सईच्या मासिकाच्या पेजवरील बोल्ड फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. याआधीही चित्रपटात बोल्ड सीन दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. लवकरच सई ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Aniket Ghate